Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) चांगली आहे. मी आमच्या कार्यकर्त्यांना देखील सांगितले ही सरकारची योजना आहे. ही योजना भाजपची किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची नसल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केले. 


लाडकी बहीण योजना ही पारदर्शक नाही


लाडकी बहिण  योजनेसाठी 1/3 बालकल्याण विभागाच्या निधीचा वापर केला आहे. लाडकी बहीण योजना ही पारदर्शक योजना नसल्याचे चव्हाण म्हणाले. ज्याप्रमाणे दहा वर्षात नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये देशात महागाई वाढली आहे, सिलेंडर दीड हजारापर्यंत गेलेला आहे. डिझेल-पेट्रोल महाग झाले आहे. प्रत्येक जीवनावश्यक वस्तूचे दर मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदी सरकारने महागाई वाढवली असल्याचे चव्हाण म्हणाले. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या 1500 रुपयांमध्ये या सर्व गोष्टीची भरपाई होईल का? तर बिलकुल होणार नाही असे चव्हाण म्हणाले. 


लाडकी बहिण  योजनेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वाद


लाडकी बहिण  योजनेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वाद सुरू असल्याचे चव्हाण म्हणाले. ही यांची वैयक्तिक योजना नसून सरकारची योजना असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. या योजनेला 48 हजार कोटी रुपयांचा वार्षिक खर्च आहे. सरकारला कर्ज काढावं लागत आहे. पण या सर्व योजनांसाठी पैसे आणणार कुठून? सरकारवर आधीच एवढे मोठे कर्ज झाले आहे. सात लाख 80 हजार कोटींचं कर्ज सरकारवर आहे. तर दोन लाख 40 हजारांचा अतिरिक्त तोटा आहे. जर तोटा धरला तर कर्ज दहा लाख कोटीपर्यंत जाते, असे चव्हाण म्हणाले. 


राज्य सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सध्या सगळीकडे चर्चा आहे. या योजनेसाठी आजघडीला कोट्यवधी महिलांनी अर्ज केलेले असून त्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यावर सरकारने पैसे पाठवण्यास सुरुवातही केलेली आहे. 16 ऑगस्टपर्यंत सरकाने तब्बल 96 लाख 35 हजार महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये पाठवले आहेत. अजूनही पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवले जात आहेत. राज्य सरकारकडून पात्र महिलांना सध्या जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3000 रुपये दिले जात आहेत. सध्यातरी 31 जुलैपर्यंत ज्या महिलांचे अर्ज पात्र ठरवण्यात आलेले आहेत, त्या महिलांच्या बँक खात्यावर हा निधी पाठवला जात आहेत. तर 31 जुलैनंतर तसेच ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये दिले जातील. 


महत्वाच्या बातम्या:


PM Kisan Yojana : लाडक्या बहिणीला 3000 हजार, आता 'नमो किसान'चे 2000; एकाच घरात 5000 रुपये मिळणार