Jubilant FoodWorks Share : भारतात डॉमिनोझ पिझ्झाची विक्री करणाऱ्या Jubilant FoodWorks कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण  झाली आहे. सोमवारी ट्रेडिंग सत्रात Jubilant FoodWorks च्या शेअरमध्ये 15 टक्क्यांची घसरण झाली. सकाळी 10 टक्क्यांनी घसरण झाल्यानंतर लोअर सर्किट लागले होते. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. 


Jubilant FoodWorks च्या शेअरची किंमत 2443 रुपये इतकी झाली होती. Jubilant FoodWorks मागील  काही वर्षात गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला होता. कंपनीच्या शेअरने 4590 रुपये प्रति शेअर इतकी उच्चांकी किंमत गाठली होती. आता मात्र, हा शेअर 2500 रुपयांच्या स्तरावर व्यवहार करत आहे. आज सकाळच्या सुमारास लोअर सर्किटदेखील लागले होते. 


शेअर्सच्या दरात का झाली घसरण? 


Jubilant FoodWorksचे सीईओ प्रतीक पोटा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा कंपनीने स्वीकारला आहे. या वृत्तानंतर Jubilant FoodWorksच्या शेअर दरात मोठी घसरण सुरू झाली. सीईओ प्रतीक पोटा यांच्या राजीनाम्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये निराशेचे वातावरण आहे. तर, परदेशी ब्रोकर संस्थांनी कंपनीच्या शेअर प्राइस टार्गेटमध्ये घट केली आहे. 


शेअर प्राइज टार्गेट काय?


Credit Suisse ने Jubilant FoodWorks शेअर टार्गेट कंपनीला 3500 रुपयांहून कमी करत 2900 इतकी केली आहे. त्याशिवाय स्टॉकला न्यूट्रल रेटिंग दिली आहे. सीईओ पोटा यांचा राजीनामा कंपनीसाठी मोठा झटका असल्याचे Credit Suisse ने म्हटले आहे. Morgaon Stanley ने Jubilant FoodWorks च्या शेअरला डाउनग्रेड करत ओव्हरवेट हून श्रेणीतून अंडरवेट श्रेणीत आणले आहे. त्याशिवाय टार्गेट प्राइस 5000 रुपयांहून 2250 इतका केला आहे. JPMorgan ने Jubilant FoodWorks च्या टार्गेट प्राइसची किंमत 4025 हून 3000 इतकी केली आहे. 


विशेष सूचना: ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. पैसे कोणत्या शेअरमध्ये गुंतवावे याबाबत इथं सल्ला दिला जात नाही )