RBI Assistant 2022 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (RBI) नोकरीच्या संधींच्या प्रतीक्षेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्यांच्या विविध कार्यालयांमध्ये 950 सहाय्यक पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. RBI च्या भरती जाहिरात (No.2A/2021-22) नुसार, असिस्टंट - 2021 भरती प्रक्रिया ही सहाय्यक पदाच्या रिक्त पदांवर निवड करण्यात येत आहे. 



जाणून घ्या पात्रता


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सहाय्यक पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बँकेने ठरवून दिलेले पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. सध्या, सहाय्यक पदांसाठी आरबीआयने ही जाहिरात जारी केली आहे. मात्र पात्रतेच्या तपशिलांशी संबंधित माहिती अधिकृतपणे प्रसिद्ध केलेली नाही, मागील वर्षांच्या RBI सहाय्यक भरती अधिसूचनांनुसार, केवळ तेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केली आहे. तसेच अंतिम वर्ष किंवा सेमिस्टर परीक्षा दिली आहे. कट ऑफ तारखेनुसार उमेदवारांचे वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार सवलत दिली जाईल.



अर्ज प्रक्रिया


RBI सहाय्यक भर्ती 2021 अंतर्गत 950 रिक्त जागांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार rbi.org.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतील. RBI द्वारे 17 फेब्रुवारी 2022 पासून सहाय्यक पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची माहिती त्याच्या जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे. त्याच वेळी, इच्छुक आणि पात्र उमेदवार 8 मार्च 2022 पर्यंत त्यांचे अर्ज ऑनलाइन सबमिट करू शकतील.


निवड प्रक्रिया
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या जाहिरातीत सहाय्यक पदांसाठी पात्र उमेदवारांच्या निवड प्रक्रियेबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे. RBI सहाय्यक भरती 2022 नुसार जाहिरात उमेदवारांना प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि भाषा प्रवीणता चाचणी (LPT) या टप्प्यांतून जावे लागेल. पहिल्या टप्प्यातील ऑनलाइन परीक्षा 26-27 मार्च 2022 रोजी होणार आहे.


 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha