Jan Dhan Account : जन धन खातेधारकांसाठी (Jan Dhan Account) आता एक आनंदाची बातमी आहे. जर तुमचे जन धन खाते असेल तर दर महिन्याला तुम्हाला 3000 रूपये मिळणार आहेत.
सरकारची योजना
'पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना' असं या योजनेचं नाव आहे, या योजनेमध्ये सरकार जन धन खाते धारकांना 3000 रूपये दर महिन्याला ट्रान्सफर करणार आहेत. हे पैसे पेंशन स्वरूपात मिळणार आहेत.
केंद्र सरकारच्या या योजनेमध्ये 18 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंतच्या कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते. जेव्हा ती व्यक्ती 60 वर्षाची होते तेव्हा या योजनेचे पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात. एका वर्षात 36000 ट्रान्सफर केले जातात.
या योजनेचा कोणाला होईल लाभ?
या योजनेचा फायदा असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना होणार आहे. स्ट्रीट वेंडर, मिड-डे मील वर्कर, हेड लोडर, वीटभट्टी कामगार, रिक्षा चालक आणि धोबी इत्यादी काम करणारे कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तसेच ज्याचे महिन्याचे उत्पन्न हे 15000 रुपयांपेक्षा कमी आहे ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता.
कोणते कागद पत्र असणे आवश्यक
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे जन धन खाते असणे आवश्यक आहे. तसेच तुमच्याकडे आधार कार्ड देखील असावे. तुम्हाला तुमच्या बचत खात्याची माहिती बँकेमध्ये द्यावी लागेल.
किती प्रीमियम भरावा लागेल?
या योजनेंतर्गत विविध वयोगटानुसार प्रत्येक महिन्याला 55 ते 200 रुपये भरावे लागतील. जर तुमचे वय 18 असेल तर तुम्हाला दर महिन्याला 55 रूपये भरावे लागतील. तसेच 30 वर्षाच्या व्यक्तीला 100 आणि 40 वर्षाच्या व्यक्लीला 200 रूपये भरावे लागतील. या योजनेत नाव नोंदवण्यासाठी तुमच्या बचत खात्याचा किंवा जनधन खात्याता आयएफएस कोड असणे गरजे आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल 100 डॉलरच्या खाली, पेट्रोलियम कंपन्यांवरील दबाव कमी, आता इंधन दर वाढणार नाहीत?
- Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घटल्या; देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha