IRCTC Tour Package : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी खास ऑफर जारी केली आहे. जर तुम्हाला काही धार्मिक स्थळांना भेटी द्यायच्या असतील तर त्या संदर्भात या ऑफर देण्यात आल्या आहेत. तुम्ही जर भुवनेश्वरमधील चिल्का, कोणार्क आणि पुरी येथील धार्मिक स्थळे, मंदिरे आणि पर्यटन स्थलांना भेट देण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण भारतीय रेल्वे तुम्हाला कोणार्क, चिल्का आणि पुरी येथे अतिशय स्वस्त दरात नेण्याची संधी देत आहे. प्रवाशांना विमानाद्वारे नेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
कशी असेल व्यवस्था
IRCTC चा हा दौरा 2 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. हा दौरा फ्लाइट टूर असेल. इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर एसी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. एवढेच नाही तर या दौऱ्यात खाण्यापिण्याची आणि निवासाचीही संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. आयआरसीटीसीने दिलेल्या माहितीनुसार, थ्री स्टार हॉटेलमध्ये रूम बुक करण्यात आल्या आहेत. यासोबतच मार्गदर्शक आणि सुरक्षेची जबाबदारीही आयआरसीटीसीवर देण्यात आली आहे. पॅकेजचे तपशील IRCTC ने या टूर पॅकेजला दिव्य पुरी टूर असे नाव दिले आहे. जर आपण या टूर पॅकेजच्या प्रवासाच्या तारखांबद्दल बोललो, तर ते 2 नोव्हेंबर 2023, 14 डिसेंबर 2023, 25 जानेवारी 2024, 17 फेब्रुवारी 2024 आणि 15 मार्च 2024 असे निश्चित करण्यात आल्या आहेत.
हे टूर पॅकेज तीन रात्री आणि चार दिवसांचे
आयआरसीटीसीचे हे टूर पॅकेज तीन रात्री आणि चार दिवसांचे असेल. या टूर पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीचे जेवण दोन्ही दिले जाईल. तसेच चिल्का, भगवान जगन्नाथ मंदिर, भुवनेश्वर आणि कोणार्क मंदिराला भेट दिली जाईल. याशिवाय जवळपासची सर्व सुंदर ठिकाणे दाखवली जातील. दिल्ली ते भुवनेश्वर असा विमान प्रवास असेल. तिथे गेल्यावर तुम्हाला थ्री स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्याच आली आहे.
या टूरसाठी किती खर्च येईल
या टूर पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती 40,900 रुपये असेल. तुम्ही 2 लोकांसोबत प्रवास केल्यास प्रति व्यक्ती 32,500 रुपये खर्च येईल. त्याचप्रमाणे तुम्ही 3 लोकांसोबत प्रवास केल्यास प्रति व्यक्ती 31,000 रुपये मोजावे लागतील. तुम्हाला या टूर पॅकेजबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल आणि हे टूर पॅकेज बुक करायचे असेल, तर त्यासाठी तुम्ही IRCTC वेबसाइटला भेट देऊ शकता.
महत्त्वाच्या बातम्या: