Darwinbox IPO: एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्यांकन असलेली एचआर टेक कंपनी  डार्विनबॉक्स (Unicorn Startup Darwinbox IPO) लवकरच बाजारात आयपीओ आणणार आहे अशी माहिती आहे. पुढील तीन वर्षांत प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) आणू शकते. कंपनीचे सहसंस्थापक रोहित चेन्नमनेनी यांनी ही माहिती दिली. 


रोहित चेन्नमनेनी यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकार परिषदेत माहिती देताना रोहित म्हणाले की, सिटी-बेस्ड असलेली ही कंपनी 2025 पर्यंत नफ्यात येण्याची अपेक्षा आहे. सध्या डार्विनबॉक्सच्या प्रवर्तकांकडे कंपनीतील 30 टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे, तर उर्वरित हिस्सा गुंतवणूकदारांकडे आहे. त्याच्या गुंतवणूकदारांमध्ये TCV, Salesforce Ventures, Sequoia, Lightspeed आणि Endiya Partners यांचा समावेश आहे.


कंपनीने दिलेलं स्टेटमेंट


यावेळी आमची योजना पुढील तीन वर्षांत आयपीओ आणण्याची आहे. सध्या आम्ही आमच्या विस्ताराची योजना करत आहोत असं कंपनीचे सह-संस्थापक म्हणाले. यालाच पुढे पुष्टी जोडताना जेव्हा तुम्ही आयपीओचा विचार करता, तेव्हा मला एक व्यवसाय म्हणून व्यापकपणे वाटते, आम्ही जगभरातील जागतिक व्यवसाय सेवा देणारा उपक्रम बनू इच्छितो असं त्यांनी म्हटलं. त्याचप्रमाणे कमाईचे तपशील शेअर करण्यास नकार देताना त्यांनी डार्विनबॉक्सची सध्या निधी उभारण्याची कोणतीही योजना नाही, परंतु आम्ही काही धोरणात्मक गुंतवणूकदार शोधत आहोत या गोष्टीला दुजोरा दिला.


कंपनीबद्दल सविस्तर माहिती


डार्विनबॉक्सने या वर्षी जानेवारीमध्ये 72 दशलक्ष डॉलर जमा केले. यासह त्याचे मूल्यांकन एक अब्ज डॉलर्सच्या (american dollars) पुढे गेले आणि ते युनिकॉर्नच्या श्रेणीत आले. व्यवसायाच्या आघाडीबाबत माहिती देताना, कंपनीचे भारत दक्षिणपूर्व आशिया – सिंगापूर, थायलंड, इंडोनेशिया, फिलीपिन्स आणि मलेशिया – आणि मध्य पूर्व प्रदेशात मजबूत अस्तित्व आहे असं कंपनी प्रशासनाने दिली आहे. 


यासोबतच डार्विनबॉक्सने नुकतेच युनायटेड स्टेट्समध्ये त्यांचे ऑपरेशन सुरू केले आहे आणि इथून पुढे ते जपान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये लॉन्च केले जाईल असं सांगण्यात आलं आहे, कंपनीचे हैदराबादमध्ये सुमारे 700 कर्मचारी आहेत आणि येत्या सहा महिन्यांत आणखी 300 कर्मचारी जोडणार आहेत. डार्विनबॉक्सने हैदराबादमध्ये आपले जागतिक मुख्यालय सुरू करण्याची घोषणा केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Petrol Diesel: पेट्रोल-डिझेलला GSTच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार तयार; केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांची माहिती