Udaan IPO : बिझनेस-टू-बिझनेस (B2B) ई कॉमर्स फर्म उडान (udaan) कंपनीने मे 2023 पर्यंत आयपीओ आणण्याची योजना आखली आहे. कंपनीचे सीईओ वैभव गुप्ता यांनी ही माहिती दिली. इकॉनॉमिक टाईम्सशी झालेल्या संभाषणात उडान 2022 च्या अखेरीस आयपीओ साठी तयार होईल असं त्यांनी सांगितलं. पुढच्या वर्षी मे महिन्यात आयपीओ लॉन्च करण्याचे आमचे ध्येय आहे. व्यवसाय, संघ आणि भांडवलाच्या बाबतीत, आम्ही चांगले काम करत असल्याचा दावाही वैभव गुप्ता यांनी केला.


गेल्या 100-120 दिवसांत कंपनीचे एकूण मार्जिन दुप्पट झाले असून सुरुवातीच्या तीन ते चार वर्षांत विस्तारही झाला आहे त्यामुळे आता गेल्या दोन तिमाहीपासून आम्ही आमच्या युनिटच्या अर्थशास्त्रावर लक्ष केंद्रित करत आहोत आणि या कालावधीतील ही कंपनीची सर्वात मोठी प्रगती आहे असंही गुप्ता यांनी सांगितलं.


प्रत्येक तिमाहीत नफा वाढताच - 
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गुप्ता यांच्या नियुक्तीच्या वेळी उडानने पुढील 18-24 महिन्यांत IPO आणण्याची योजना असल्याचे सांगितले होते. गुप्ता म्हणाले, “ही एक मोठी बाजारपेठ आहे आणि आम्ही मजबूत व्यवस्थापन संघासह मजबूत स्थितीत आहोत. त्रैमासिक आमची संख्या आणि नफा सुधारतो आहे. मला वाटते की, आम्ही आमचा IPO आणण्यास तयार आहोत." आयपीओसाठी 6 ते 12 महिने योग्य आहेत. बाजार अस्थिर राहिल्यास, काही आठवड्यांचा विलंब होऊ शकतो, अशी माहिती त्यांनी दिली. उडान ही सिंगापूर-मुख्यालय असलेली कंपनी आहे, त्यामुळे परदेशात सूची करावी लागेल. तरीही तो विचाराधीन आहे.


esop ची योजना - 
उडानने प्रत्येक कर्मचाऱ्याला एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स (ईएसओपी) देण्याची घोषणा केली आहे. तसेच, कंपनीने आपल्या धोरणात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत, ज्या अंतर्गत ते किमान एका वर्षाच्या ऐवजी प्रत्येक तिमाहीत स्टॉक घेऊ शकतात. अनेक स्टार्टअप्समध्ये एक वर्ष कालावधीची अट सामान्य आहे. यानंतर, उडानवरील ESOP धारकांची संख्या चौपट झाली आहे आणि 100% कर्मचाऱ्यांकडे आता ESOP आहेत, असे कंपनीने म्हटले आहे. त्याची कर्मचारी संख्या सुमारे 4,600 आहे.