Tata Group IPO :  शेअर बाजारात टाटा समूहातील (Tata Group) टाटा टेक्नॉलॉजीची (Tata Technologies) दणक्यात लिस्टिंग झाल्यानंतर आता टाटांची आणखी एक कंपनी लिस्ट होण्याच्या तयारी आहे. टाटांच्या आणखी एका कंपनीचा आयपीओ बाजारात येणार आहे. टाटा ग्रुप आपली ऑटो कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस कंपनी 'टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम्स' ही शेअर बाजारात लिस्ट करण्याच्या तयारी आहेत. 


सध्या टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम्समध्ये भागीदारी असलेल्या टाटा समूहातील कंपन्यांमध्ये आयपीओबाबत चर्चा सुरू आहे. मात्र येत्या काही दिवसांत आयपीओ लॉन्च करण्याची औपचारिक प्रक्रिया सुरू होणार आहे.


'मनीकंट्रोल'च्या वृत्तानुसार, टाटा ऑटोकॉम्प सिस्टम्सबाबत चर्चा अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. कंपनीत भागभांडवल असलेल्या टाटा समूहाच्या विविध कंपन्यांमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. किती भागभांडवल विकायचे याबाबतही चर्चा सुरू आहे. Tata Autocomp Systems (TACO) मध्ये टाटा समूहाच्या वेगवेगळ्या कंपन्यांचे भागभांडवल आहे.


टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम्स (TACO) मध्ये टाटा समूहाच्या विविध कंपन्यांची होल्डिंग्स असून, टाटा सन्सचा 21 टक्के हिस्सा आहे. उर्वरित भागभांडवल टाटा इंडस्ट्रीजकडे आहे. Tata Autocomp Systems ची स्थापना 1995 मध्ये झाली. कंपनी समूहातील ऑटो व्यवसायाशी संबंधित उपक्रमांसाठी व्हेईकल म्हणून काम करते. 


2011 मध्ये, टाटा समूह टाटा ऑटोकॉम्प सिस्टम्सचा 750 कोटी रुपयांचा IPO लॉन्च करणार होता. कंपनीला आयपीओ लाँच करण्यासाठी सेबीकडून मंजुरीही मिळाली होती, परंतु बाजारातील खराब वातावरणांमुळे आयपीओ लॉन्च करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. यावेळी कंपनी IPO लाँच करण्याआधी मोठ्या गुंतवणूकदाराची रस्सीखेच करू शकते. यापूर्वी, टाटा टेकच्या आयपीओपूर्वी, टीपीजी समूहाला टाटा टेकमध्ये स्टेक देण्यात आला होता.


Tata Autocomp Systems ही ऑटो क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे. जे इंटिरियर प्लास्टिक आणि कंपोझिट, रेडिएटर्स, बॅटरी, स्टॅम्पिंग, सस्पेंशन, सीटिंग, ईव्ही पॉवरट्रेन, ईव्ही बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम आणि इंजिन कूलिंग सिस्टममध्ये उपस्थित आहे. कंपनीच्या कॉर्पोरेट फाइलिंगनुसार, 2022-23 मध्ये कंपनीचा महसूल 57 टक्क्यांनी वाढून 14,372 कोटी रुपये झाला आहे.


(Disclaimer: ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. ही बातमी कोणताही शेअर विषयक सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. गुंतवणुकीआधी शेअर बाजार तज्ज्ञ, आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.)