IREDA IPO : रतन टाटा यांच्या टाटा टेक आणि सरकारी कंपनी IREDA ची लिस्टिंग एका दिवसाच्या अंतराने झाली असेल, पण कमाईच्या बाबतीत IREDA ने टाटा टेकला खूप मागे टाकले आहे. 32 रुपयांच्या या शेअरने कमाईच्या बाबतीत 500 रुपयांच्या शेअरला धोबीपछाड दिल्याचं दिसून आलं. IREDA च्या शेअर्सने मंगळवारी 100 रुपये ओलांडले आणि त्याच्या IPO किमतीतून 200 टक्क्यांहून अधिक परतावा दिला. तर टाटाचे शेअर्स आयआरईडीएच्या सूचिबद्धतेच्या एका दिवसानंतर बाजारात आले होते. ज्याने यापूर्वीच 1400 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठून 180 टक्क्यांहून अधिक परतावा दिला होता. त्यानंतर टाटा टेकचा शेअर 1200 ते 1300 रुपयांच्या दरम्यान स्विंग होत आहे. आजही कंपनीचे शेअर्स इश्यू किमतीपेक्षा 150 टक्के जास्त आहेत. 


IREDA IPO चा 200 टक्क्याहून अधिक परतावा 


IREDA ही कंपनी पूर्णपणे सरकारच्या मालकीची कंपनी आहे. त्याचा आयपीओही बऱ्यापैकी बंपर होता. ही कंपनी लिस्ट होऊन 10 ट्रेडिंग दिवसही गेले नाहीत आणि तिने 200 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाले तर मंगळवारी तिच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आणि 102.02 रुपयांची विक्रमी पातळी गाठली. तर कंपनीच्या शेअर्सची इश्यू किंमत 32 रुपये होती. याचा अर्थ कंपनीच्या शेअर्सने 10 ट्रेडिंग दिवसांत 218 टक्के परतावा दिला आहे. 


एक लाखाचे तीन लाख झाले


जर एखाद्या गुंतवणूकदाराने IREDA शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याचे मूल्य 3.25 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते. IREDA IPO च्या एका लॉटचे मूल्य 14,720 रुपये होते. जर एखाद्या गुंतवणूकदाराला 7 लॉट मिळाले असते तर त्याचे मूल्य 1,03,040 रुपये झाले असते. आज एका शेअरचे मूल्य 102.02 रुपये झाले आहे. याचा अर्थ गुंतवणूकदाराच्या शेअर्सचे मूल्य 3,28,504 रुपये झाले आहे. म्हणजे गुंतवणूकदाराला 2.25 लाख रुपयांपेक्षा जास्त निव्वळ नफा झाला असेल.


टाटा कंपनीला मागे सोडले


IREDA च्या एका दिवसानंतर टाटा टेकचे शेअर बाजारात दाखल झाले. 30 नोव्हेंबरला जेव्हा कंपनीचे शेअर्स लिस्ट झाले तेव्हा ते चांगलेच तेजीत होते. त्याच दिवशी कंपनीचे शेअर 1400 रुपयांवर पोहोचले. तर कंपनीची इश्यू किंमत 500 रुपये होती. म्हणजेच कंपनीने त्याच दिवशी 180 टक्के परतावा दिला होता. त्यानंतर कंपनीचे शेअर कधीच त्या पातळीवर पोहोचले नाहीत. कंपनीच्या शेअर्सनेही मंगळवारी दिवसाच्या उच्चांकावर रु. 1263.15 गाठले आणि इश्यू किमतीपेक्षा 152 टक्क्यांनी जास्त आहे. पण आत्तापर्यंत ते गुंतवणूकदारांना इश्यू प्राईसमधून 200 टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकत नाही.


ही बातमी वाचा: