IPO : भारतातील सर्वात मोठ्या एअरपोर्ट सर्व्हिस एग्रीगेटर प्लॅटफॉर्म DreamFolks Services Limited चा आयपीओ 24 ऑगस्ट रोजी उघणार आहे. हा आयपीओ तीन दिवसांसाठी खुला असेल, म्हणजेच गुंतवणूकदार 26 ऑगस्टपर्यंत यामध्ये सबस्क्रिप्शनसाठी अर्ज करू शकतील. अँकर गुंतवणूकदारांसाठी 23 ऑगस्ट रोजी एक दिवस आधी हा इश्यू उघडला जाईल. या आयपीओ अंतर्गत कोणतेही नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत. ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत कंपनीचे प्रवर्तक 1.72 कोटी इक्विटी शेअर्स विकतील.
मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, कंपनीचे प्रवर्तक लिबर्था पीटर कलाट, दिनेश नागपाल आणि मुकेश यादव हे सेबीला सादर केलेल्या कागदपत्रांनुसार ऑफर फॉर सेल विंडो अंतर्गत शेअर्स विकतील. कंपनी विमानतळावर ग्राहकांना लाउंज, फूड, स्पा, मीट आणि असिस्ट आणि ट्रान्सफर सारख्या सुविधा पुरवते. कंपनी 2013 पासून या व्यवसायात आहे. इक्विरस कॅपिटल आणि मोतीलाल ओसवाल गुंतवणूक सल्लागारांना या इश्यूसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे.
कंपनीची आर्थिक स्थिती
31 सप्टेंबर 2021 पर्यंत कंपनीची एकूण संपत्ती 64.7 कोटी रुपये होती. सप्टेंबर २०२१ च्या तिमाहीत कंपनीचा महसूल ८५.१ कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीला 105.6 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. हे आर्थिक वर्ष 2020 पेक्षा कमी आहे. आर्थिक वर्ष 2020 मध्ये महसूल 367.04 कोटी रुपये होता.
व्यवसाय मॉडेल
कंपनीचे अॅसेट-लाइट बिझनेस मॉडेल भारतात कार्यरत असलेले जागतिक कार्ड नेटवर्क आणि क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड जारीकर्त्यांना विमानतळ लाउंज ऑपरेटर आणि इतर विमानतळ सेवा प्रदात्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर जोडते. त्यामुळे प्रवाशांना विमानतळाशी संबंधित सेवा सहज उपलब्ध होणार आहेत.
सिरमा SGS टेक्नॉलॉजीच्या आयपीओलाही चांगला प्रतिसाद
सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीच्या आयपीओसाठी सदस्यता घेण्याचा काल (गुरुवार) शेवटचा दिवस होता. या IPO ला चांगला प्रतिसाद मिळाला. हा आयपीओ एकूण 32.61 वेळा भरला आहे. जर आपण रिटेलबद्दल बोललो तर ते 5.53 पट भरले आहे. 23 ऑगस्ट रोजी हा आयपीओ वाटप होईल अशी अपेक्षा आहे. या उत्तम प्रतिसादामुळे ग्रे मार्केटमध्येही याला बळ मिळाले आहे. ग्रे-मार्केट निरीक्षकांचे म्हणणे आहे की सिरमा एसजीएसचा शेअर सध्या 48 रुपये प्रति शेअरच्या प्रीमियमवर आहे. गुरुवारी, म्हणजे काल, सकाळी त्याचा ग्रे-मार्केट प्रीमियम 36 रुपये होता. त्यानुसार आज त्यात 12 रुपयांनी वाढ झाली आहे.