SEBI-IPO News: वर्ष 2021 हा आयपीओने भरलेला वर्ष ठरला. तर या वर्षीही अनेक मोठे आयपीओ बाजारात दाखल होण्याच्या तयारीत आहेत. एलआयसीच्या आयपीओवरून सरकार आणि सेबीला मोठा धडा मिळाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसोबतच आता QIB आणि NII चे पैसे देखील बँकेत जमा केले जातील, या पूर्वी मात्र असं होत नव्हतं. सेबी 1 सप्टेंबरपासून हा नियम सर्वांवर लागू करणार आहे.
सेबीने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, बँक खात्यात पैसे जमा झाल्यानंतरच IPO अर्जाचा विचार केला जाईल. हे नियम QIB, NII सह सर्वांना लागू होतील. 1 सप्टेंबरपासून जर अर्जासह बँक खात्यात पैसे जमा केले असतील, तरच आयपीओ अर्जांचा विचार केला जाईल. हा नियम सर्व IPO वर लागू होईल.
एक्सचेंजेस इलेक्ट्रॉनिक बुक प्लॅटफॉर्मवर अर्जासोबत पैसे जमा झाल्यानंतर अर्ज घेतला जाईल. रिटेल, क्यूआयबी, एनआयआयसह सर्वांसाठी हा नियम लागू होईल. तत्पूर्वी, आयपीओचे ओव्हरसबस्क्रिप्शन दाखवण्यासाठी विना पैसे ब्लॉक करता अर्जासाठी या मार्गाचा वापर केला जात होता, असा आरोप आहे. यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांची दिशाभूल होण्याची शक्यता होती, कारण किरकोळ गुंतवणूकदार क्यूआयबी, एचएनआय सबस्क्रिप्शन आकडे पाहून पैसे गुंतवायचे.
कॉजेंट ई-सर्व्हिसेसच्या IPO ला हिरवा झेंडा
दरम्यान, कॉजेंट ई-सर्व्हिसेस लिमिटेडला इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) द्वारे भांडवल उभारण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ची मंजुरी मिळाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी IPO अंतर्गत 150 कोटी रुपयांचे नवीन शेअर जारी करेल. यासोबतच कंपनीच्या प्रवर्तकांकडून 94.68 लाख इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) आणली जाईल.
महत्वाच्या बातम्या :