Post Office scheme : प्रत्येक व्यक्तीला आपल्या मुलांच्या भविष्यासाठी बचत करायची असते. ही बचत अशा ठिकाणी गुंतवायची असते जिथे पैसे सुरक्षित असतील आणि परतावाही चांगला असेल. अशा परिस्थितीत, पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूक योजना हा एक सुरक्षित पर्याय आहे. आज आपण पोस्ट ऑफिसच्या एका उत्तम योजनेबद्दल (Post Office scheme) माहिती सांगणार आहोत, ज्यामध्ये फक्त एकदाच पाच लाख रुपये गुंतवून तुम्ही 15 लाख रुपये कमवू शकता म्हणजेच १० लाख रुपयांचा थेट फायदा, तोही कोणत्याही जोखीमशिवाय होतो. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
नेमकी काय आहे योजना?
पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेबाबतची माहिती आपण पाहणार आहोत. ज्याला सामान्य भाषेत पोस्ट ऑफिस एफडी असेही म्हणतात. यामध्ये तुम्ही दरवर्षी एकरकमी रक्कम जमा करता आणि त्यावर व्याज मिळते. या योजनेची सर्वात खास गोष्ट म्हणजे ही एक सरकारी योजना आहे. त्यामुळं त्यात पैसे बुडण्याचा धोका नाही. सध्या, पोस्ट ऑफिस 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर 7.5 टक्के वार्षिक व्याज देत आहे, जे अनेक बँकांपेक्षा जास्त आहे.
5 लाखांचे 15 लाख कसे करायचे?
जर तुम्ही आज 5 लाख रुपये पोस्ट ऑफिसच्या एफडीमध्ये 5 वर्षांसाठी एकरकमी गुंतवले तर तुम्हाला वार्षिक 7.5 टक्के व्याज मिळेल. 5 वर्षांनंतर तुमची गुंतवणूक सुमारे 7 लाख 24 हजार 974 रुपये होईल पण इथेच थांबू नका. हे पैसे पुन्हा त्याच योजनेत 5 वर्षांसाठी पुन्हा गुंतवा आणि पुढील 5 वर्षांत ही रक्कम 10 लाख 51 हजार 575 रुपये होईल. आता तिसऱ्यांदा 5 वर्षांसाठी पुन्हा एकदा जमा करा. यावेळी ही रक्कम सुमारे 15 लाख 24 हजार 149 रुपये होईल. म्हणजेच, तुमची सुरुवातीची 5 लाखांची रक्कम आता 15 वर्षांत तिप्पट झाली आहे.
फायद्यांचे साधे गणित
तुम्ही फक्त एकदाच 5 लाख रुपये जमा केले आणि 15 वर्षे ते काढले नाहीत, तर तुम्हाला दरमहा कोणताही हप्ता भरावा लागला नाही किंवा तुम्हाला बाजारातील जोखीम घेण्याची गरज पडली नाही. तरीही, 15 वर्षांनंतर, तुम्हाला 15 लाख रुपयांपेक्षा जास्त परतावा मिळत आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला 10 लाख रुपयांचा थेट नफा झाला आहे. पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेची सर्वात खास गोष्ट म्हणजे ही एक सरकारी योजना आहे. त्यामुळं त्यात पैसे बुडण्याचा धोका नाही.
महत्वाच्या बातम्या: