Elon Musk Tips: तुम्हीही जर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवता, तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलोन मस्क यांचा हा मोलाचा सल्ला तुमच्या कामी येऊ शकतो. अनेक यशस्वी कंपन्या निर्माण करणारे अमेरिकन उद्योजक मस्क सोशल मीडियावर, विशेषतः ट्विटरवर खूप सक्रिय असतात. अलीकडेच त्यांनी ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली आहे आणि लवकरच हा करार पूर्ण होणार आहे. याच दरम्यान यांनी एक ट्वीट केलं आहे. ज्यात त्यांनी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना बाजारात पैसे कधी गुंतवावे आणि केव्हा गुंतवू नये, याबाबत सल्ला दिला आहे.
मस्क यांनी गुंतवणूकदारांना दिला 'हा' सल्ला
मस्क यांनी गुंतवणूकदारांना सांगितले की, कोणत्या गोष्टींनंतरही घाबरण्याची गरज नाही. या सर्वांसोबतच मस्कने लोकांना दर्जेदार स्टॉक्स कसे निवडायचे, हे देखील सांगितले. त्यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, तुम्हाला खात्री असलेल्या उत्पादने आणि सेवा ऑफर करणाऱ्या अनेक कंपन्यांचे स्टॉक खरेदी करा. त्या कंपनीचे उत्पादन किंवा सेवा खराब आहे, असे वाटत असेल तर लगेच त्याची विक्री करा. जेव्हा बाजार घसरायला लागतो तेव्हा घाबरू नका. हे लॉन्ग टर्म तुमच्या भल्यासाठी आहे.
मस्कने टेस्लाचे लाखो शेअर्स विकले
मस्क यांनी ट्वीट अशा वेळी आले आहे, जेव्हा त्यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी त्यांचे काही स्टॉक विकले आहेत. यूएस मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनला दिलेल्या माहितीनुसार, एलोन मस्कने या करारासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी टेस्लाचे 8.5 अब्ज डॉलर्स किमतीचे शेअर्स विकले आहेत. त्यांनी कंपनीचे 96 लाख शेअर्स 822.68 ते 999.13 डॉलर्स या श्रेणीत विकले आहेत. यानंतर त्यांनी ट्विटमध्ये सांगितले की, आता टेस्लाचे आणखी शेअर्स विकण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या: