Post Office Scheme: अलीकच्या काळात लोकांना गुंतवणुकीचे (investment) वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. ज्या ठिकाणी आपल्या ठेवीवर चांगला परतावा मिळतो, त्या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसतायेत. दरम्यान, पोस्ट ऑफिसची (Post Office Scheme) अशीच एक योजना आहे की, ज्या योजनमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मदत ठेवीपेक्षी (FD) चांगला फायदा मिळतो. जाणून घेऊयात या योजनेबद्दल सविस्तर माहिती. 


राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजना


आज आपण पोस्ट ऑफिसच्या (Post Office Scheme) राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. या योजनेत लोकांना चांगला परतावा मिळत आहे. FD पेक्षा चांगला परतावा मिळत असल्यानं ही योजना लोकांच्या फायद्याची ठरत आहे. या योजनेत तुम्ही पैशांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला कोणताही धोका नाही. तुम्ही जर या योजनेत पाच वर्षे गुंतवणूक केली तर तुम्हाला 7.7 टक्के व्याज मिळते. त्यामुळं गुंतवणूकदारांना मोठा फायदा होतो. 


FD वर किती मिळतो परतावा


राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजनेत लोकांना चांगला फायदा मिळत आहे. FD पेक्षा अधिक परतावा मिळत असल्यानं गुंतवणुकदारांना एक चांगला पर्याय आहे. दरम्यान, FD वर कोणत्या बँकेत किती परतावा मितो याबाबतची माहिती पाहुयात. तुम्ही जर पोस्टाच्या योजनेत FD केली तर तुम्हाला 7.5 टक्क्यांचा परतावा मिळतो. तसेच तुम्ही जर पंजाब नॅशनल बँकेत एफडी केली तर तुम्हाला 6.5 टक्के, बँक ऑफ इंडियात FD केली तर 6.5 टक्के, एचडीएफसीमध्ये FD केली तर 7 टक्के परतावा मिळत आहे. मात्र, तुम्ही जर पोस्टाच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला 7.7 टक्के परतावा मिळत आहे. त्यामुळं तुमच्या नफ्यात अधिक वाढ होत आहे. 


किती रुपयांपासून गुंतवणूक सुरु कराल?


राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजनेत तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही 1000 रुपयापासून सुरुवात करु शकता. जास्तीत जास्त किती रुपयांची गुंतवणूक तुम्ही या योजनेत करु शकता. यावर कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. ही योजना पाच वर्षात पूर्ण होते. या योजनेत वार्षिक आधारावर चक्रवाढ व्याज मिळते. घरातील 10 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावाने देखील तुम्हाला खाते उघडता येते.  


महत्वाच्या बातम्या:


कमी गुंतवणुकीत अधिक फायदा,  25 हजार रुपये पगार असतानाही तुम्ही बनू शकता करोडपती, फक्त 'हे' काम करा