Mutual Funds SIP : अलीकडच्या काळात म्युच्युअल फंड एसआयपीमधील  (Mutual Funds SIP) गुंतवणूक (Investment) झपाट्याने वाढली आहे.  कारण, दीर्घकालीन एसआयपी (SIP) खूप लवकर संपत्ती निर्माण करण्यास मदत करते. तुम्ही दीर्घकालीन SIP मध्ये शिस्तबद्ध आणि सतत गुंतवणूक केल्यास, तुम्ही काही वर्षातच लक्षाधीश होऊ शकता. तुम्ही SIP मध्ये अगदी 500 रुपयांपासून मासिक गुंतवणूक सुरू करू शकता.


जर तुम्हाला SIP द्वारे लवकरात लवकर करोडपती बनायचे असेल तर तुम्हाला त्यात गुंतवणूक करण्यासाठी विशेष धोरण अवलंबावे लागेल. योग्य नियोजन केल्यास काही वर्षातच तुम्ही करोडपती व्हाल. SIP मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला लवचिकता देखील मिळते. म्हणजेच तुम्ही कधीही रक्कम वाढवू किंवा कमी करु शकता. कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास तुम्ही SIP थांबवू शकता आणि परिस्थिती सामान्य झाल्यावर तेथून पुन्हा सुरुवात करु शकता. तसेच, तुम्ही ते बंद करून कधीही पैसे काढू शकता. पण जर तुम्हाला SIP द्वारे लवकरात लवकर करोडपती व्हायचे असेल, तर तुम्हाला त्यात गुंतवणूक करण्यासाठी विशेष धोरण अवलंबावे लागेल. 


'या' सूत्रानुसार एसआयपीमध्ये झपाट्याने पैसे वाढतील


जर तुम्हाला म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे पैसे गुंतवायचे असतील, तर सर्वप्रथम तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किमान 20 ते 25 वर्षांसाठी एसआयपी सुरू करा. या SIP मध्ये तुम्ही दरवर्षी 10 टक्क्यांनी गुंतवणूक वाढवत रहा. उदाहरणार्थ- जर तुम्ही 5000 रुपयांची मासिक SIP सुरू केली, तर पुढील वर्षी गुंतवणुकीची रक्कम 500 रुपयांनी वाढवून 5500 रुपये करा, पुढच्या वर्षी ती आणखी 10 टक्के वाढवा आणि 5550 रुपये करा. अशाप्रकारे, दर वर्षी SIP गुंतवणुकीची रक्कम 10 टक्के वाढवत ठेवा आणि 20 ते 25 वर्षे चालू ठेवा.


कसे बनाल करोडपती? 


आर्थिक तज्ञांचा असा विश्वास आहे की दीर्घकाळात, SIP सरासरी 12 टक्के परतावा देते. कधीकधी आपण यापेक्षा जास्त मिळवू शकता. जर तुम्ही एसआयपीमध्ये 5000 रुपयांची गुंतवणूक सुरू केली आणि या गुंतवणुकीत दरवर्षी 10 टक्के वाढ करत राहिल्यास. अशा प्रकारे तुम्ही 21 वर्षात करोडपती होऊ शकता. अशा स्थितीत, तुमची 21 वर्षातील एकूण गुंतवणूक 38,40,150 रुपये होईल, परंतु तुम्हाला 12 टक्के दराने व्याज म्हणून केवळ 77,96,275 रुपये मिळतील. 21 वर्षांनंतर तुम्ही 1,16,36,425 रुपयांचे मालक व्हाल. जर तुम्ही ही गुंतवणूक 25 वर्षे सतत चालू ठेवली तर एकूण गुंतवणूक 59,00,824 रुपये होईल आणि तुम्हाला 1,54,76,907 रुपये फक्त 25 वर्षांत व्याज म्हणून मिळतील. अशा स्थितीत 25 वर्षांनंतर तुम्ही एकूण 2,13,77,731 रुपयांचे मालक व्हाल.


महत्त्वाच्या बातम्या:


50,000 रुपये पगार असल्यास दरमहा किती बचत करावी? जाणून घ्या श्रीमंत होण्याचं सूत्र