Investment Plan News : सध्याच्या काळात गुंतवणुकीसाठी (Investment) विविध योजना आल्या आहे. या योजनांच्या माध्यमातून चांगला परतावा मिळतो. कमी कालावधीत अधिक नफा मिळवून देणाऱ्या अनेक योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून तुम्ही करोडपती होऊ शकता. तुम्ही सुरुवातीला थोडी थोडी गुंतवणूक करु शकता. तुम्ही म्युच्युअल फंडातील (mutual fund) एसआयपीमध्ये (SIP) गुंतवणूक करुन मोठा नफा मिळवू शकता. यामध्ये केलेल्या गुंतवणुकीतून तुम्ही लवकरच म्हणजे काही वर्षातच करोडपती होऊ शकता. 


10 वर्षातच तुम्ही करोडपती 


गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडातील SIP खूप महत्वाची आहे. यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही कमी काळात करोडपती होऊ शकता. यासाछी योग्य नियोजनाची गरज आहे. तुम्हाला जर 10 वर्षात करोडपती व्हायचं असेल तर तुम्हाला दरमहा 36000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. ज्यावर 15 टक्क्याच्या परताव्यानुसार 10 वर्षात व्याजासह तुमची गुंतवणूक ही 1,00,31,662 रुपयांची होईल, म्हणजे 10 वर्षातच तुम्ही करोडपती व्हाल. महिना 36000 हजाराने तुम्ही 10 वर्षात 43,20,000 रुपये गुंतवाल. यावर तुम्हाला 57,11,662 रुपयांचा परतावा मिळेल. दरम्यान, तुम्हाला जर  15 वर्षात करोडपती व्हायचं असेल तर मासिक 15 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.  


20 वर्षात कसं व्हाल करोडपती?


जर तुम्हाला 20 वर्षात करोडपती व्हायचं असेल तर तुम्हाला गुंतवणुकीचं योग्य नियोजन करावं लागेल. यासाठी तुम्हाला मासिक 6000 रुपये भरावे लागतील 20 वर्षानंतर व्याजासकट तुमची रक्कम 1 कोटी रुपयांच्या पुढे जाईल. तुमच्या गुंतवणुकीवर जर तुम्हाला 15 टक्के परतावा मिळाला तर तुमची रक्कम ही 15,84,000 रुपये गुंतवली जाईल आणि त्यावर परतावा हा  84,21,303 एवढा होईल. ही सर्व रक्कम मिळूव तुमची कमाई 1 कोटी रुपयांच्या पुढ जाईल.


फंडाची निवड करताना योग्य ती काळजी घ्यावी


म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी काही काळजी घेणं गरजेचं असतं. यामध्ये योग्य त्या फंडाची निवड करणे महत्वाचे असते. फंडाची निवड करण्यासाठी तुम्ही योग्य सल्लागाराची मदत घेऊ शकता. त्याचे सल्ल्यानेच फंडाची निवड करा. फंडाची योग्य निवड केल्यास तुम्हाला कमी काळात अधिकचा फायदा मिळू शकतो. 


महत्वाच्या बातम्या:


चार वर्षांत एका लाखाचे झालेत तब्बल 45 लाख, छप्परतोड रिटर्न्स देणाऱ्या 'या' कंपनीविषयी माहिती आहे का?