Millionaire Formula : अनेकांना वाटते की, आपल्याला मिळणाऱ्या पैशातून (Money) काहीतरी रक्कम बचत करावी. कारण गुंतवणुकीचं ( investment), बचतीचं महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यातील संकटांचा सामना करण्यासाठी आत्तापासून गुंतवणूक करणं गरजेचं आहे. तुम्हालाही करोडपती व्हायचं असेल तर योग्य ठिकाणी योग्य वेळी गुंतवणूक करावी लागते. याबाबतची माहिती आज आपण पाहणार आहोत. जर तुम्ही फक्त 1 लाख रुपये गुंतवले तरीदेखील तुम्ही करोडपती होऊ शकता, जाणून घेऊयात करोडपती होण्याचा फॉर्म्युला. 


तुम्ही अशा काही ठिकाणी गुंतवणूक करावी जिथे अधिक रक्कम परतावाच्या स्वरूपात मिळेल. यामध्ये म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय असू शकतो. तुम्ही Mutul Funds मध्ये एकरकमी किंवा दर महिन्याला पैसे गुंतवू शकता. यावर तुम्ही वार्षिक व्याजाचा लाभ घेऊ शकता.


कसे व्हाल करोडपती?


जर तुमच्याकडे फक्त 1 लाख रुपये आहेत आणि तुम्हाला हे पैसे एकरकमी गुंतवायचे आहेत. यावरील वार्षिक परतावा जर 12 टक्के गृहीत धरला, तर निवृत्तीपर्यंत तुम्ही किती पैसे जमा करु शकता. जर तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षी 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल,  तुम्ही 60 वर्षांचे झाल्यावर ही गुंतवणूक जवळपास 100 पटीने वाढून सुमारे 1 कोटी रुपये होते. हे चक्रवाढ दरामुळे घडते, कारण तुमचे पैसे 40 वर्षे कोणत्याही विराम न देता वेगाने वाढत राहतील. त्यामुळं निवृ्त्तीनंतर तुम्ही आरामात जीवन जगू शकाल. तुम्हाला कोणत्याही पेन्शनची गरज भासणार नाही. 


वयाच्या 30 व्या वर्षी गुंतवणूक केली तर..


जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी एक लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली तर तुमची 1 लाख रुपयांची गुंतवणूक निवृत्तीपर्यंत केवळ 30 पट वाढते, परिणामी वयाच्या 60 व्या वर्षी तुमची रक्कम 30 लाख रुपये होते. दुसरीकडे तुम्ही जर वयाच्या 40 व्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर 1 लाख रुपयांवर 12 टक्के वार्षिक परताव्यासह वयाच्या 60 व्या वर्षी फक्त 10 पटीने वाढून 10 लाख रुपये होतील. लवकरात लवकर गुंतवणूक केल्यास तुम्हाला मोठा फायदा मिळतो. यासाठी तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षापासून गुंतवणूक केली तर तुम्हाला मोठा परतावा मिळतो. तुम्ही करोडपती होऊ शकता.


तुम्ही लवकर गुंतवणूक केल्यास फायदा


दीर्घ मुदतीत अधिक पैसे कमावले जातात. तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षी 1 लाख रुपये जमा केले तर 60 व्या वर्षी तुम्हाला 1 कोटी रुपये मिळू शकतात. त्याचवेळी, वयाच्या 30 आणि 40 व्या वर्षी 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला अधिक फायदा मिळू शकत नाही. जर तुम्ही निवृत्तीनंतर चांगली रक्कम वाचवली तर पुढचे आयुष्य खूप सोपे होऊ शकते. नियमित उत्पन्नासाठी, तुम्हाला कुठेही काम करण्याची किंवा कोणत्याही पेन्शनवर अवलंबून राहण्याची गरज नाही. 


महत्वाच्या बातम्या:


तुम्हाला करोडपती व्हायचंय? गुंतवणुकीचा 15x15x15 नियम वापरा, कोट्याधीश व्हा, जाणून घ्या सविस्तर माहिती