IndiGo : जर तुम्ही विमानाने प्रवास करण्याचा विचार करत असाल तुमचा तो प्रवास आता महागणार आहे. आता प्रवाशांना इंडिगोच्या तिकिटांसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. देशातील सर्वात मोठी देशांतर्गत वाहतूक कंपनी इंडिगोने आपल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या मार्गांवर इंधन अधिभार लागू करण्याची घोषणा केली आहे. एटीएफच्या सातत्याने वाढणाऱ्या किंमती पाहता इंडिगोने 1000 हजार रुपयांचे इंधन शुल्क लागू केले आहे. 


इंडिगोने आपल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या मार्गांवर इंधन अधिभार लागू करण्याची घोषणा केली आहे. एटीएफच्या सातत्याने वाढणाऱ्या किमती पाहता इंडिगोने उद्यापासून (6 ऑक्टोबरपासून ) 1000 रुपयांचे इंधन शुल्क लागू केले आहे. 1000 रुपयांचे हे शुल्क कमाल मर्यादेसाठी आहे. त्यानंतर विमान तिकिटे महाग होणार हे निश्चित आहे.


इंधन शुल्क 1000 रुपयांपर्यंत असेल


आज रात्री 12 वाजल्यापासून इंडिगोच्या देशांतर्गत आणि परदेशी फ्लाइट्सवर इंधन शुल्क लागू केले जाईल. अंतरानुसार वेगवेगळे दर लागू होतील. सर्वात कमी इंधन शुल्क 300 रुपये आणि कमाल शुल्क 1000 रुपये आहे.


वेगवेगळ्या किलोमीटरवर किती इंधन आकारले जाईल याबाबतची माहिती


0-500 किमीवर 300 रुपये
501-1000 किमीसाठी 400 रुपये
1001-1500 किमी वर 550 रुपये
1501-2500 किमी वर 650 रुपये
2501-3500 किमी वर 800 रुपये
3501 किमी वर 1000 रुपये


विमान कंपनीने नेमका का घेतला हा निर्णय?


इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांत प्रचंड वाढलेल्या आणि दर महिन्याला सतत वाढत असलेल्या एव्हिएशन टर्बाइन इंधनाच्या किमती लक्षात घेऊन इंधन शुल्क लागू केले जात आहे. एटीएफचा एअरलाइन्सच्या ऑपरेटिंग खर्चाचा मोठा भाग आहे. त्यामुळं उड्डाणांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. ज्याला सामोरे जाण्यासाठी हा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे इंडिगोनं म्हटलं आहे. नुकतीच देशातील सर्वात मोठी देशांतर्गत विमान कंपनी इंडिगोने आपल्या वैमानिक आणि केबिन क्रूच्या पगारात वाढ केली होती. मात्र आता हा इंधन अधिभार लादून एअरलाईन्सने धक्का दिला आहे. या इंधन अधिभाराचा बोजा शेवटी प्रवाशांवरच पडणार हे नक्की आहे.


इंडिगो (IndiGo) ही भारत देशामधील विमानसेवा पुरवणारी एक विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोचे मुख्यालय गुरगांव येथे आहे. ही कंपनी कमी दरात सेवा देणाऱ्या जगातील कंपन्यांमध्ये सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्यांपैकी एक आहे. इंटरग्लोब एन्टरप्राइझेसच्या राहुल भाटिया आणि अमेरिकास्थित अनिवासी भारतीय राकेश गंगवाल या दोघांनी मिळून 2006 च्या सुरुवातीस ही कंपनी उभी केली.


महत्त्वाच्या बातम्या:


IndiGo Flight: इंजिनमध्ये बिघाड, डेहराडूनला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे दिल्लीत इमर्जन्सी लॅंडिंग; सर्व प्रवासी सुरक्षित