GST Collection March 2023:  देशात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी कलेक्शनने (GST Collection) सरकारच्या तिजोरीत चांगलीच भर पडली आहे. मार्च 2023 मध्ये जीएसटी संकलन (March 2023 GST Collection) चांगले झाले आहे. मार्च 2023 मध्ये देशाचे जीएसटी संकलन 1 लाख 60 हजार 122 कोटी रुपये इतके झाले. जीएसटीच्या आजपर्यंतच्या इतिहासातील हे दुसरे सर्वात मोठे संकलन आहे. जीएसटी कर संकलनाच्या दृष्टीने गेल्या आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना चांगला गेला आहे.


आतापर्यंतचे दुसरे सर्वात मोठे GST संकलन


देशातील जीएसटीच्या इतिहासातील हे दुसरे सर्वोच्च महसूल संकलन आहे. एप्रिल 2022 नंतरचे दुसरे सर्वोच्च जीएसटी संकलन  आहे. मार्च 2023 च्या जीएसटी संकलनातील विशेष बाब म्हणजे सलग 14 महिने जीएसटी संकलन हे 1.4 लाख कोटी रुपयांच्यावर राहिले आहे. दुसरीकडे, देशात जीएसटी लागू झाल्यापासून, जीएसटी संकलन 1.6 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याची ही दुसरी वेळ आहे. मागील वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेच यंदाच्या वर्षी जीएसटी महसुलात 13 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. 


आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये जीएसटी संकलन किती झाले?


आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एकूण 18.10 लाख कोटी रुपये जीएसटी कर जमा करण्यात आला. दर महिन्याला सरासरी 1.51 लाख कोटींचा महसूल जमा करण्यात आला. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये मागील वर्ष 2021-22 च्या तुलनेत 22 टक्के अधिक जीएसटी जमा झाला. 


मार्च 2023 मध्ये एकत्रित GST महसूल 1, लाख 60 हजार 122 कोटी आहे. यामध्ये सीजीएसटी 29 हजार 546 कोटी, SGST 37 हजार 314 कोटी, IGST हा 82  हजार 907 कोटी (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या 42 हजार 503 कोटींसह) 10 हजार 355 कोटी (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या 960 कोटींसह) असे प्रमाण आहे.  


 






महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी


मार्च 2023 मध्येही सर्वाधिक जीएसटी संकलन महाराष्ट्रातून करण्यात आले. महाराष्ट्रातून 22 हजार 695 कोटी जीएसटी जमा करण्यात आला. तर, दुसऱ्या क्रमांकावर गुजरात राज्य आहे.  गुजरातमधून 9919 कोटींचा जीएसटी वसूल करण्यात आला. तर, तिसऱ्या स्थानावरील तामिळनाडूमधून 9245 कोटींचा जीएसटी जमा झाला. हरयाणामधून 7780 कोटींचा जीएसटी जमा झाला.  


इतर महत्त्वाच्या बातम्या: