DGCA Report: भारतीयांमध्ये हवाई प्रवासाची (Air Travel) क्रेझ वाढत आहे. देशांतर्गत विमान कंपन्यांचा हवाई प्रवास खर्चीक आहे. तरीदेखील प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या देशात सध्या सणासुदीचा हंगाम सुरू असल्यानं विमान वाहतूक क्षेत्रात प्रवाशांचा कल वाढला आहे. डीजीसीएने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये देशात हवाई प्रवास करणाऱ्यांची संख्या 11 टक्क्यांनी वाढली आहे. या कालावधीत सुमारे 1.26 कोटी प्रवाशांनी विमानाने प्रवास केला. आकडेवारीनुसार, इंडिगो एअरलाइन्स अजूनही या क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे. 


इंडिगोने उड्डाण केलेल्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक 


या कालावधीत एअर इंडियाचा बाजार हिस्सा 10.5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. विस्तारा आणि एअर एशियाच्या बाजारपेठेत मात्र घसरण झाली आहे. स्पाईसजेट आणि आकासा एअरही त्यांच्या जागी ठाम आहेत. DGCA नुसार, 79 लाखांहून अधिक लोकांनी इंडिगो एअरलाइन्सचा वापर केला. ही कंपनी भारतीय बाजारपेठेत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. सप्टेंबरमध्ये कंपनीचा बाजारातील हिस्सा 63.4 टक्के होता. देशातील हवाई वाहतूक क्षेत्र दरवर्षी सुमारे 11 टक्के दराने वाढत आहे. सप्टेंबरमध्ये या कंपन्यांनी अंदाजे 1.22 कोटी लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले होते.


विस्तारा आणि एअर एशियाचे नुकसान 


गेल्या महिन्यात, विस्तारा आणि एअर एशिया इंडिया यांना बाजारातील शेअरमध्ये थोडासा तोटा झाला आहे. आता विस्ताराचा बाजार हिस्सा 9.7 टक्के आणि एअर एशियाचा 6.6 टक्के आहे. स्पाइस जेटचा बाजारातील हिस्सा 4.4 टक्क्यांवरून 5 टक्के झाला आहे. याशिवाय आकाशाने अजूनही 4.2 टक्के बाजारपेठ काबीज केली आहे.


587 प्रवाशांना जागा मिळाली नाही


विमान वाहतूक नियामक DGCA च्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबरमध्ये विविध कारणांमुळे 587 प्रवाशांना विमानात जागा देण्यात आली नाही. तसेच, उड्डाण रद्द झाल्याने 30,307 प्रवाशांना त्रास झाला. गेल्या महिन्यात 1.78 लाखांहून अधिक प्रवाशांना उशीर झाल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागला होता.


महत्त्वाच्या बातम्या:


Air India : नव्या जोमानं सुरुवात! दर सहा दिवसांनी एअर इंडियाला मिळणार नवं विमान, प्रवाशांना मिळणार खास सुविधा