FPI Investment : जगाच्या काही भागात कोविड-19 चा संसर्ग असूनही भारतीय शेअर बाजारावर त्याचा विशेष परिणाम दिसत नाही. कारण विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार अर्थात एफपीआयनी पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात परतणे सुरू केले आहे. एफआयपीने डिसेंबरमध्ये भारतीय शेअर बाजारात 11,119 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. सलग दुसऱ्या महिन्यात गुंतवणूकदारांचा असा ओघ बघायला मिळाला..
एकीकडे अशी गुंतवणूकदार जरी परत येत असले तरी, अलीकडच्या काळात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार सावध झाले आहेत. डिपॉझिटरीजमधील डेटा दर्शवितो की नोव्हेंबर महिन्यात FPIs द्वारे गुंतवलेल्या एकूण 36,239 कोटींच्या तुलनेत डिसेंबरमधील गुंतवणूक खूपच कमी होती.
Foreign investors favor the Indian market: विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजाराला अनुकूल
जगभरात काही भागांमध्ये कोविडचा पुन्हा सुरु झाला आणि यूएसमध्ये मंदीची चिंता असूनही आपल्या इथे डिसेंबरमध्ये FPIs भारतीय इक्विटी मार्केटमध्ये निव्वळ खरेदीदार राहिले आहेत असं मॅनेजर रिसर्च, मॉर्निंग स्टार इंडियाचे असोसिएट डायरेक्टर हिमांशू श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे,
2022 was the worst year in terms of FPI flows: एफपीआय प्रवाहाच्या दृष्टीने 2022 हे वर्ष सर्वात वाईट होते
अनेक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात नफाही बुक केला. एकूणच, FPIs ने 2022 मध्ये भारतीय इक्विटी मार्केटमधून 1.21 लाख कोटी रुपये काढले आहेत. एफपीआय गुंतवणुकीच्या दृष्टीने हे सर्वात वाईट वर्ष होते. या आधी 3 वर्षात निव्वळ गुंतवणूक होती.
Among the top-10 companies, the market cap of 8 companies increased by Rs 1.35 lakh crore: टॉप-10 कंपन्यांमधील 8 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 1.35 लाख कोटी रुपयांची वाढ झाली
या दरम्यान गेल्या आठवड्यात म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 8 कंपन्यांच्या बाजार भांडवलात 1 कोटी 35 लाख 794.06 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मार्केट कॅपमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स निर्देशांकाने तेजी नोंदवली. सेन्सेक्स 995.45 अंकांनी किंवा 1.66 टक्क्यांनी वाढला. टॉप-10 कंपन्यांमध्ये फक्त हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि भारती एअरटेल यांची घसरण झाली.
इतर बातम्या:
S-Presso Xtra: मारुतीची टॉप सेलिंग हॅचबॅकचा येणार लिमिटेड एडिशन, मिळणार जबरदस्त फीचर्स