Sharad Pawar : 15 वर्षांपूर्वी फळबाग लागवडीच्या संबंधित प्रचार राष्ट्रीय पातळीवर न्यावा अशी योजना मी आखली होती. आज भारत जगात सर्वात जास्त फळांचे उत्पादन (Fruit production) करणारा देश असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केलं. अनेक देशात गेलो की तेथील बाजरात जातो. तेव्हा मला त्या बाजारात भारताचा शिक्का बघायला मिळतो असेही पवार म्हणाले. आज देशात मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचे उत्पादन होते. परदेशातही द्राक्षाची निर्यात (Grapes export) होत असल्याचे पवार म्हणाले. इंदापूर (Indapur) तालुक्यातील बोरी गावात शरद पवारांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.


एकेकाळी 86 टक्के लोक शेती करायचे तो आकडा 60 टक्क्यांवर आला असल्याचे शरद पवार म्हणाले. शरद पवार हे आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहे. या दैऱ्यात त्यांनी विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रातील काही गाव अशी आहेत की त्याबद्दल जास्त आत्मयिता आहे. प्रतिकूल परिस्थितीवर तेथील शेतकरी मात करुन चांगली शेती करत असल्याचे शरद पवार म्हणाले. 15 वर्षांपूर्वी फळबाग लागवड संबंधित प्रचार हा राष्ट्रीय पातळीवर न्यावा अशी योजना मी आखली आज जगात सर्वात जास्त फळ उत्पादन करणारा देश भारत असल्याचे पवार म्हणाले.


एकरी 100 टनापेक्षा जास्त ऊसाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याची भेट


इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यात शरद पवारांनी काही शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतीची पाहणी केली. यामध्ये कळस येथील शेतकरी मधुकर खर्चे यांच्या शेताला शरद पवारांनी भेट दिली. मधुकर खर्चे यांनी एका एकरात 100 टनापेक्षा अधिक उत्पादन घेतले आहे. गेली अनेक वर्षे खर्चे हे 100 टनापेक्षा जास्त उत्पादन घेत आहेत. त्यांच्या ऊस शेतील भेट दिल्यानंतर शरद पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.  याआधी एकरी 100 टनापेक्षा जास्त ऊसाचे उत्पादन घेणारा आणि 50 कांड्याचा ऊस मी कधी बघितला नसल्याचे शरद पवार म्हणाले.


ब्राझीलमध्ये सहा ते सात शेतकरी कारखाना चालवतात


सध्या देशात मोठ्या प्रमाणावर साखरेचं उत्पादन होतं आहे. भारत साखरेच्या उत्पादनात जगात एक नंबरचा देश असल्याचे शरद पवार म्हणाले. ब्राझीलमधील लहान शेतकऱ्यांचा ऊस 50 हजार टन असतो. 
ब्राझीलमध्ये सहा ते सात ऊस उत्पादक शेतकरी एकत्र येऊन कारखाना चालवतात. आपल्या इथे काही हजारात सभासद असतात असेही शरद पवार म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: