Share Market Opening Bell : आज आठवड्याच्या शेवटच्या (Stock Market Opening) दिवशी बाजारात चांगली सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांतील व्यवहार पाहता आज बाजारात तेजीसह सुरुवात झाली आहे. मागील चार दिवसाच्या घसरणीनंतर बाजाराची चांगली सुरुवात पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्ससह (Sensex) निफ्टीची घोडदौड सुरु झाली आहे. बाजार सुरु होताच बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 253 अंकानी उसळी घेऊन 59,859 वर उघडला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) निफ्टी (Nifty) 80 अंकांनी वाढून 17,500 वर उघडला.
चार दिवसाच्या घसरणीनंतर बाजाराची चांगली सुरुवात
आज शेअर बाजारातील तेजी पाहायला मिळत आहे. पीएसयू बँक, आयटी, मेटल आणि इतर काही सेक्टर्सचे शेअर्स तेजीत आहेत. मीडिया शेअर्समध्ये मात्र थोडीशी घसरण झाली. शेअर बाजारात बँक निफ्टी बाजारात तेजीत आहे. गेल्या अनेक ट्रेडिंग सत्रांमध्ये बाजार तेजीसह उघडला होता, मात्र बुकिंग आणि विक्रीमुळे बाजार बंद होण्याच्या वेळी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
सेन्सेक्ससह निफ्टी तेजीत
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात घोडदौड पाहायला मिळत आहे. आज बाजार उघडताच सेन्सेक्स हीटमॅपमधील 30 पैकी 23 शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत. यामध्ये भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस आणि एसबीआय हे सर्वाधिक कमाई करणारे शेअर्स आहेत. पीएसयू बँक, आयटी, मेटल आणि इतर काही क्षेत्रातील शेअर्स चांगली कमाई करताना दिसत असून मीडिया शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
आज बाजारातील परिस्थिती काय?
आजच्या ट्रेंडीग सत्रात बँकिंग, आयटी, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्सची खरेदी होताना दिसत आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही तेजी आहे. बँक निफ्टी तेजीत व्यवहार करत असून निर्देशांकात 0.75 टक्क्यांनी उसळी पाहायला मिळत आहे. निफ्टी आयटी देखील 0.72 टक्क्यांच्या तेजीत व्यवहार करत आहे. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 24 शेअर्स वाढीसह आणि 6 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 37 शेअर्स तेजीसह आणि 13 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.
'या' शेअर्सची कमाई
आज सुरुवातीच्या सत्रात इंडसइंड बँक 1.33 टक्के, एसबीआय 1.23 टक्के, बजाज फिनसर्व्ह 1.18 टक्के, कोटक महिंद्रा 0.93 टक्के, इन्फोसिस 0.88 टक्के, एनटीपीसी 0.88 टक्के, भारती एअरटेल 0.71 टक्के, विप्रो 0.65 टक्के, फिनसर्व्ह बँक 0.60 टक्के, ॲक्सिस 0.60 टक्के एचसीएल टेक 0.62 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत.
'या' शेअर्समध्ये घसरण
शेअर बाजारात आज महिंद्रा अँड महिंद्रा 0.86 टक्के, आयटीसी 0.50 टक्के, टाटा स्टील 0.49 टक्के, टायटन कंपनी 0.47 टक्के, टाटा मोटर्स 0.40 टक्के, मारुतु सुझुकी 0.29 टक्क्यांनी घसरले आहेत.