मुंबई : अलीकडच्या काही काळात आयपीओला गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळातो आहे किंबहुना मिळाला आहे. काही आयपीओची लिस्टिंग झाल्यापासूनची त्याची कामगिरीही मजबूत आहे. गेल्या काही काळात काही कंपन्यांच्या आयपीओच्या दमदार कामगिरीमुळे त्यांच्या मालकांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. आयपीओतल्या गुंतवणुकीमुळे पहिल्यांदाच भारतातील टॉप श्रीमंतांच्या यादीत काही उद्योगपतींचा समावेश झाला आहे. यातील टॉप तीन नावे आहेत. एव्ही वेंकटरामन, अश्विन देसाई आणि राकेश कुमार वर्मा. आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 मध्ये त्यांचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे.

या तीन उद्योगपतींची ओळख करुन घेऊया,

एव्ही वेंकटरामन 

या यादीत लेटेंटव्ह्यूचे चेअरमन एव्ही वेंकटरामन यांच्या नावाचा समावेश आहे. LatentView च्या आयपीओला ३२६ पट सबस्क्रिप्शन मिळाले. लिस्ट झाल्यापासून या समभागाने आतापर्यंत गुंतवणूकदारांना ९३ टक्के परतावा दिला आहे. 119 रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत तो 380 रुपयांवर ट्रेडिंग करत आहे. सध्या 52 वर्षीय एव्ही वेंकटरामन यांचा भारतातील श्रीमंतांच्या यादीत समावेश झाला असून त्यांची संपत्ती 5500 कोटी रुपये झाली आहे.

अश्विन देसाई 

एथर इंडस्ट्रीजच्या आयपीओच्या आधारे अश्विन देसाई यांनीही भारतातील श्रीमंतांच्या यादीत प्रवेश केला आहे. कंपनीचे संस्थापक प्रवर्तक आणि व्यवस्थापकीय संचालक असून त्यांचे वय 71 वर्ष आहे. अश्विन देसाई यांची एकूण संपत्ती 10300 कोटी आहे.  Aether Industries  रसायन निर्मात्याचा आयपीओ 6 पट पेक्षा जास्त सदस्य असलेला झाला. दुसरीकडे, शेअरने इश्यू किमतीच्या तुलनेत 50 टक्के परतावा दिला आहे.

राकेश कुमार वर्मा 

CE Info Systems चे 71 वर्षीय CEO राकेश कुमार वर्मा भारतातील श्रीमंतांच्या यादीत 371 व्या क्रमांकावर आले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 4300 कोटींवर गेली आहे. CE Info Systems चा आयपीओ १५४ वेळा सबस्क्राइब झाला. त्याच वेळी, इश्यू किमतीच्या तुलनेत 30 टक्के परतावा मिळाला आहे.

बाकीच्या मंडळींनाही प्रथमच स्थान

नेहा अभय वकील, 11700 कोटी, एशियन पेंट्स

फैसल कोटकोलन, 9500 कोटी, केईएफ होल्डिंग्ज

विवेक अभय वकील, 8400 कोटी, एशियन पेंट्स

आला अयोध्या रामी रेड्डी, 7400 कोटी, रामकी ग्रुप

किशोर आर छाब्रिया आणि कुटुंब, 7400 कोटी, अलाईड ब्लेंडर आणि डिस्टिलर्स

भैरवी अभय वकील, 7300 कोटी, एशियन पेंट्स