भारतीय रेल्वे (Indian Railway) आपल्या प्रवाशांसाठी एक नवीन सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्याद्वारे आता टिकीटावरील तारीख बदलता येईल. (Indian Railways ticket Date Change) म्हणजे जर तुमच्याकडे 10 तारखेचं तिकीट आहे आणि तुम्हाला 20 तारखेला प्रवास करायचाय तर तुम्ही नवीन तिकीट न काढता आहे त्या तिकीटावर तारीख बदलू शकता. 

Continues below advertisement

सध्याच्या नियमानुसार जर तिकीटावरील तारीख बदलता (Date Change) येत नाही. जर तुम्हाला दुसऱ्या तारेखला प्रवास करायचा असेल तर तुम्हाला आहे तो तिकीट कॅन्सल (Ticket Cancell) करून पुन्हा नवीन तिकीट घ्यावं लागतं, पण त्यातही सीट कन्फर्म (Confirm Seat) मिळेल की नाही? याची गॅरंटी कमी असेत. त्यामुळे प्रवास करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. 

तारीख कशी बदलायची?

Continues below advertisement

आता रेल्वेच्या नवीन नियमानुसार तिकीटावरील तारीख बदलता येईल आणि त्यासाठी तुम्हाला अधिकचे पैसे किंवा फीस देण्याची गरज नसेल. प्रवासी रेल्वेची वेबसाईट किंवा IRCTC अॅपवरून तारीख बदलू शकता. 

सीट मिळणार का?

पण लक्षात ठेवा तुम्ही जर तारीख बदलली तर तुम्हाला कन्फर्म सीट मिळेलच असं नाही, ट्रेनच्या क्षमतेनुसार आणि उपलब्ध कोटानुसार सीट मिळेल. जर सीट मिळालं तर प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागतील.

नवीन नियम कधीपासून

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, जानेवारी 2026 मध्ये ही नवीन प्रणाली लागू केली जाऊ शकते. त्यामुळे तिकीट कॅन्सल आणि डबल बुकिंग थांबेल.