Taliban Pakistan War: काबूलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यानंतर, अफगाणिस्तान सैन्याने डुरंड रेषेवरील (पाकिस्तान-अफगाण सीमा) पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला (Taliban Pakistan War) केला आहे. अफगाणिस्तान सैन्याने काही पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. हेलमंड, पक्तिया, खोस्त आणि नांगरहारमध्ये पाकिस्तानी आणि अफगाण सैन्यात तीव्र चकमकी झाल्याचे वृत्त आहे. या भागात तणाव वेगाने वाढत आहे आणि सीमेवरील परिस्थिती गंभीर आहे.

टोलो न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने पुष्टी केली की अफगाण आणि पाकिस्तानी सैन्यातील चकमकीत आतापर्यंत 12 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत आणि दोन जण जखमी झाले आहेत. या लढाईत पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या लष्करी सुविधांचेही मोठे नुकसान झाले. इस्लामिक अमिराती ऑफ अफगाणिस्तानच्या सैन्याने अनेक पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्या आहेत, तर कुनार आणि हेलमंड प्रांतांमध्ये अफगाण सीमेवरील प्रत्येकी एक चौकी ताब्यात घेतली आहे.

पाकिस्तानला अफगाण सीमेवर मोठा फटका- (Pakistan-Afghanistan Border)

गृहयुद्ध आणि टीटीपी दहशतवाद्यांच्या हल्ल्यांना तोंड देत असलेल्या पाकिस्तानला अफगाण सीमेवर मोठा फटका बसला आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील कुर्रम सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यात हिंसक चकमकी सुरू झाल्या आहेत. अफगाणिस्तान सैन्याने पाकिस्तानी फ्रंटियर कॉर्प्सच्या चौकीवर शस्त्रांनी गोळीबार केला आहे. वृत्तानुसार, अफगाणिस्तान सैन्याने भारतीय वेळेनुसार 11 ऑक्टोबर रात्री 9.30 वाजताच्या सुमारास पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला केला.

तालिबानने काय म्हटलं? (Taliban Pakistan War)

तालिबान संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात हल्ल्याबाबत म्हटले आहे की, पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे वारंवार उल्लंघन केल्याच्या प्रत्युत्तरात इस्लामिक अमिरात (तालिबान) च्या सशस्त्र दलांनी आज रात्री ड्युरंड रेषेवरील पाकिस्तानी सैन्याच्या स्थानांवर यशस्वी प्रत्युत्तरात्मक हल्ला केला.

पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याला तालिबानचे प्रत्युत्तर- (Taliban response to Pakistan's airstrikes)

9 ऑक्टोबरला रात्री पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील काबूल आणि पक्तिका प्रांतांवर हवाई हल्ले केल्यानं दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. पाकिस्तानने केलेल्या या हवाई हल्ल्यात काबूल आणि पक्तिका येथील एक संपूर्ण नागरी बाजारपेठ आणि 35 निवासी घरे उद्ध्वस्त केली. यानंतर काबूल आणि पक्तिका येथे झालेल्या हल्ल्यांचे परिणाम आता भोगावे लागतील, असा इशारा अफगाणिस्तानकडून देण्यात आला होता. त्यानंतर 11 ऑक्टोबर रोजी रात्री अफगाणिस्तानकडून पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला केला. 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO: