नवी दिल्ली : अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाचा भारतावर परिणाम होऊ शकतो. अमेरिकेने चीनमधून येणाऱ्या काही वस्तूंवर आयात शुल्क वाढवले ​​आहे. हा दर लागू होण्यापूर्वी चीनला आपला अधिकाधिक माल अमेरिकन बाजारपेठेत पाठवायचा आहे. त्यासाठी भारतातून रिकामे कंटेनर चीनकडे पाठवले जात आहेत. त्यामुळे भारतात कंटेनरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. जागतिक स्तरावर मागणीमध्ये घट निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम भारतावरही होणार असून भारताच्या निर्यातीत ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये घट होण्याची शक्यता आहे. निर्यातदारांना त्यांचा माल पाठवण्यासाठी कंटेनर मिळत नसल्याचे कारण आहे.


अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने अनेक चिनी वस्तूंवर आयात शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये स्टील ते सोलर सेल, लिथियम आयन बॅटरी आणि त्यांचे भाग, इलेक्ट्रिक वाहने आणि वैद्यकीय उत्पादनांचा समावेश आहे. हा दर या वर्षापासून ते 2026 पर्यंत अनेक टप्प्यांत लागू केला जाणार आहे. यामुळेच हा दर लागू होण्यापूर्वी अमेरिकेला जास्तीत जास्त माल अमेरिकेला पाठवायचा आहे. परिमामी चीनमध्ये कंटेनरची मागणी अचानक वाढली आहे. 


जगभरातून रिकामे कंटेनर चीनला पाठवले जात आहेत. भारतही यापासून लांब नाही. येमेनच्या हुथी बंडखोरांनी एडनच्या आखातातून जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य केले होते. त्यामुळे कंटेनरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 


चिनी वस्तूंवर अमेरिकेचे उच्च आयात शुल्क ऑगस्टपासून लागू होण्यास सुरूवात झाली आहे. यामुळेच चिनी निर्यातदारांना त्यांचा माल लवकरात लवकर अमेरिकेत पाठवायचा आहे. रिकामे कंटेनर स्टॉक करण्यासाठी चीनला पाठवले जात आहेत. त्यातून माल अमेरिकेला पाठवता येईल. 


युरोपियन युनियन आणि कॅनडानेही चीनच्या मालावर आयात शुल्क वाढवले ​​आहे. तांबड्या समुद्रातील संकटामुळे भारतात येणाऱ्या जहाजांचा मार्ग लांबला आहे. तसेच त्यांना भारतीय बंदरांवर बराच वेळ थांबावे लागते. त्यामुळेच अनेक शिपिंग कंपन्या भारतात येण्याचे टाळत आहेत.


ही बातमी वाचा: