India GDP: भारतीय अर्थव्यवस्थेनं आज (19 नोव्हेंबर) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. प्रथमच भारतीय अर्थव्यवस्थेचा GDP (Gross domestic product) 4 दशलक्ष डॉलर्सवर पोहोचला आहे. यासह आपण जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहोत. जीडीपीच्या बाबतीत जगात अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. तर चीन दुसऱ्या स्थानावर असून, जपान तिसऱ्या स्थानावर आहे. तर जर्मनी चौथ्या स्थानावर आहे.
पुढील चार वर्षांत भारत होणार जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था
भारतीय अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या वाढीचा वेग पाहता, अर्थशास्त्रज्ञांचा अंदाज आहे की भारत पुढील चार वर्षांत म्हणजे 2027 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. येत्या काही वर्षात अमेरिका, चीन आणि भारत या जगातील तीन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असतील असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
जीडीपी म्हणजे काय?
GDP म्हणजे Gross Domestic Product. हे दिलेल्या कालावधीत देशात उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे एकूण आर्थिक मूल्य आहे. सामान्यत: एका वर्षाचा कालावधी देशाचा जीडीपी मोजण्यासाठी वापरला जातो. जीडीपी हे देशाच्या आर्थिक आरोग्याचे सर्वसमावेशक स्कोअरकार्ड आहे. ते देशाचा विकास आणि आर्थिक प्रगती ओळखते. जीडीपी वाढीचा दर हा देशाच्या आर्थिक कामगिरीचा एक महत्त्वाचा सूचक आहे. देशाच्या राष्ट्रीय सांख्यिकी एजन्सीद्वारे सामान्यतः आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करून GDP ची गणना केली जाते. खर्च, उत्पादन किंवा उत्पन्न वापरून GDP ची गणना तीन प्रकारे केली जाते.
अमेरिका हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश
अमेरिका हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. अमेरिकेचा जीडीपी हा 25.5 ट्रिलियन डॉलर आहे. तर 18 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसह चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर जपानचा 4.2 ट्रिलियन डॉलर्स आणि जर्मनीची अर्थव्यवस्था ही 4 ट्रिलियन डॉलर्सची आहे. दरम्यान, S&P ग्लोबल मार्केट व्यतिरिक्त, इतर अनेक जागतिक संस्थांनी देखील असे दावे केले आहेत. सध्याच्या काळात भारताचा GDP 2022 मध्ये 3.5 ट्रिलियन डॉलर आहे, जो 2030 पर्यंत वाढून 7.3 ट्रिलियन डॉलर होईल. जपान व्यतिरिक्त भारत 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकेल. सध्याच्या काळात भारताचा GDP 2022 मध्ये 4 ट्रिलियन डॉलर आहे, जो 2030 पर्यंत वाढून 7.3 ट्रिलियन डॉलर होईल. या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेतील तेजीसाठी वाढत्या देशांतर्गत मागणीला जबाबदार धरण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: