Forex reserve increased : भारतीयांसाठी एक दिलासादासयक बातमी आहे. परदेशी गुंतवणूकदारांचा भारताकडे अधिक कल वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. गेल्या दोन आठवड्यात परकीय चलन साठ्यात (Forex reserve) 9.53 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 79 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 1 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा 6.55 अब्ज डॉलरने वाढून 625.626 अब्ज डॉलर झाला आहे.


यावर्षी भारताचा परकीय चलनसाठा 650 अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता


सलग दोन आठवडे भारतातील परकीय चलनाच्या साठ्यात वाढ झाली आहे. याआधी गेल्या आठवड्यात, एकूण परकीय चलन साठा 2.975 अब्ज डॉलरने वाढून 619.072 अब्ज डॉलर झाला होता. परकीय चलनसाठा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये देशाच्या परकीय चलनाने उच्च पातळी गाठली होती. जी 645 अब्ज अमेरिकन डॉलर्सची सर्वकालीन उच्च पातळी होती. तेव्हापासून आजतागायत परकीय चलन राखीव पातळी या पातळीवर पोहोचलेली नाही. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी भारताचा परकीय चलनसाठा 650 अब्ज डॉलर्सच्या जवळपास पोहोचण्याची शक्यता आहे. RBI ने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात सोन्याचा साठा 569 दशलक्ष डॉलरने वाढून 48.417 अब्ज डॉलर झाला आहे. यासह, मध्यवर्ती बँकेने असेही म्हटले आहे की स्पेशल ड्रॉइंग राइट्स (एसडीआर) मध्ये कपात करण्यात आली आहे. जी 17 दशलक्ष डॉलरवरुन 18.18 बिलियन डॉलर झाली आहे.


परकीय चलन साठा हा डॉलरच्या स्वरुपात साठवला जातो


देशाच्या परकीय चलन साठ्याला FOREX किंवा Foreign Reserve Exchange असंही म्हटलं जातंय. हा साठा परकीय चलनाच्या रुपात साठवला जातोय जेणेकरुन ही रक्कम आवश्यक त्यावेळी वापरता येईल. सध्या भारताचा परकीय चलन साठा हा डॉलरच्या स्वरुपात साठवला जातोय कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर हे सर्वाधिक वापरलं जाणारं आणि विश्वासू चलन आहे.


महत्वाच्या बातम्या:


विदेशी संपत्तीनं भारताची तिजोरी भरली! महिनाभरात तिजोरीत आले 1.37 लाख कोटी; सविस्तर माहिती एका क्लिकवर