Income Tax Return : आयकर विभागाच्या (ITR) म्हणण्यानुसार, ज्या करदात्यांनी 30 जून 2023 पर्यंत आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही, त्यांचे पॅनकार्ड 1 जुलै 2023 पासून इन-ऑपरेटिव्ह होईल असे सांगण्यात आले होते. जर एकदा पॅन कार्ड इन-ऑपरेटिव्ह झाले तर तुम्ही अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करू शकणार नाहीत. यामध्ये आयकर रिटर्न भरण्यापासून ते बँकेकडून पैशांच्या व्यवहारापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. पॅन कार्ड निष्क्रिय असल्यास, तुम्ही 31 जुलैपूर्वी आयटीआर दाखल करू शकणार नाही.  


कारण आता ITR ची मुदत संपायला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. आयटीआर भरण्यासाठी पॅनकार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही रिटर्न फाईल करू शकत नाही. निष्क्रिय पॅन पुन्हा सक्रिय केल्यास, त्याला जास्तीत जास्त 30 दिवस लागतील. जर पॅन कार्ड सध्या निष्क्रिय असेल तर दंड भरल्यानंतर ते पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत, पॅन कार्ड सक्रिय होईपर्यंत, आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत चुकण्याची शक्यता आहे. 


अंतिम मुदतीनंतर ITR कसा भरावा?


जर तुम्ही 31 जुलैपर्यंत ITR भरला नाही तर तुम्हाला उशिरा ITR भरावा लागेल. या प्रक्रियेला 'विलंबित आयटीआर' म्हणतात. या अंतर्गत करदात्यांना दंडासह आयटीआर भरावा लागेल. जर तुम्ही 31 जुलैनंतर पॅन कार्ड सक्रिय केले असेल, तर तुम्हाला उशीर झालेला ITR दाखल करावा लागेल. याचाच अर्थ तुम्हाला पॅन कार्ड सक्रिय करण्यासाठी आणि उशिरा ITR साठी दंड भरावा लागेल.


किती असेल दंड?


तुमचे जर एकूण उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला उशिरा ITR फाईलिंगसाठी 5,000 रुपये दंड भरावा लागेल. तुमचा पॅन सध्या निष्क्रिय असल्यास, तुम्हाला 5,000 रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. आणि तुमचा पॅन आधारशी लिंक केल्यास 1,000 रुपये दंड आहे. एकूणच 6 हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे. जर, तुमचे एकूण उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त नसल्यास, उशिरा आयटीआर फाईलिंगसाठी 1,000 रुपये विलंब शुल्क लागू होईल. म्हणजेच 6 हजार रुपयांऐवजी तुम्हाला फक्त 2 हजार रुपये भरावे लागतील. 


दंड भरला असेल तरच ITR भरला जाईल 






जर तुम्ही पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी आधीच दंड भरला असेल तरच तुम्ही ITR दाखल करू शकणार आहात. म्हणजेच, जर तुम्ही 30 जूनपर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी दंड भरला असेल, तरच तुम्हाला पॅनला आधारशी लिंक करण्याची परवानगी असेल. आयकर विभागाच्या ट्विटनुसार, लिंकिंगसाठी दंड 30 जूनपर्यंत भरला असेल आणि पॅन लिंक नसेल तर विभागाकडून त्यावर विचार केला जाईल असे सांगण्यात आले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :


HDFC Bank Hikes Interest Rates: HDFC चे कर्ज महागले; ग्राहकांवर EMI चा भार वाढणार!