New Wage Salary : केंद्र सरकार पुढील महिन्यापासून नवीन वेतन संहिता (New Wage Code) लागू करण्याच्या तयारीत आहे. पुढील महिन्यात वेतन संहिता लागू झाल्यास खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होणार आहे. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना या बदलामुळे फायदा आणि नुकसान एकाच वेळी होणार आहे. नवीन वेतन संहितेमुळे निवृत्ती पश्चात मिळणाऱ्या निधीत ((New Wage Code Retirement Benefits) फायदा होणार आहे. तर,  तुमच्या हाती इन-हँड-सॅलरी कमी होणार आहे. 


सध्या सुरू असलेल्या चर्चांनुसार, New Wage Code 2019 पुढील महिन्यापासून 1 जुलैपासून लागू करण्यात येणार आहे. नवीन नियमांनुसार, खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ही एकूण सॅलरीच्या 50 टक्के होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्याचा भविष्य निर्वाह निधीतील (PF) हिस्सा वाढणार आहे. त्याशिवाय, कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटीदेखील वाढणार आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर, नोकरी सोडल्यानंतर चांगला आर्थिक फायदा मिळणार आहे. 


आता सीटीसीमधून कापला जातो पीएफ


कोणत्याही कर्मचाऱ्याच्या सीटीसीमध्ये अनेक भाग असतात.  यामध्ये मूळ वेतन (Basic Salary), HRA,PF, Gratuity सारखे निवृत्ती पश्चात फायदे, विविध भत्ते आदींचा समावेश असतो. जु्न्या वेतनाच्या रचनेनुसार,  मूळ वेतन हे एकूण वेतनाच्या 35 ते 40 टक्के असतात. मूळ वेतनाच्या आधारे  पीएफची रक्कम कापली जाते. नियमांनुसार, कंपनीकडून PF Employee Contribution म्हणून मूळ वेतनातून 12 टक्के कापतात. ही रक्कम कर्मचाऱ्याचा पीएफमधील हिस्सा आहे. इतकाच भाग हा कंपनीला कर्मचाऱ्याच्या पीएफमध्ये द्यावा लागतो. 


सध्याच्या वेतनाची रचना काय?


सध्याच्या सीटीसीमध्ये साधारणपणे मूळ वेतन 35-40 टक्के, HRA 15 टक्के, ट्रान्सपोर्ट अलाउन्स 15 टक्के, स्पेशल अलाउंस 30-35
टक्के इतके प्रमाण असते. 


नवीन वेतन संहिता काय सांगते?
 
वेतन संहिता 2019 नुसार, कर्मचाऱ्याचे मूळ वेतन हे सीटीसी अथवा एकूण पगाराच्या 50 टक्के असले पाहिजे. मूळ वेतनात वाढ झाल्यानंतर पीएफमधील हिस्सा आणि ग्रॅच्युएटीत वाढ होणार आहे. मात्र, यामुळे इन-हँड सॅलरी कमी होण्याची शक्यता आहे. नव्या वेतन संहितेत ग्रॅच्युएटी ही Deemed Basic Salary च्या आधारे मोजली जाणार आहे. ही रक्कम एकूण पगाराच्या 50 टक्के कमी असता कामा नये. जर तुमचा एकूण पगार हा 2 लाख रुपये आहे आणि मूळ वेतन 50 हजार रुपये असेल तर तुमची ग्रॅज्युएटी एक लाख रुपयांच्या हिशोबाने मोजली जाणार आहे.