मुंबई : सध्या देशभरातील शेतकऱ्यांना पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) लाभ मिळत आहे. या योजनेच्या अंतर्गत वर्षाला 6000 रुपये दिले जातात. या योजनेच्या माध्यमातून सरकार पात्र शेतकऱ्यांना तीन टप्प्यात हे सहा हजार रुपये देते. दरम्यान, या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास तो कसा करावा? नेमकं कोणत्या संकेतस्थळाला भेट द्यावी? हे जाणून घेऊ या...
शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी तसेच पेरणी, फवराणी तसेच इतर महत्त्वाच्या शेतीविषयक कामांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी हा या योजनेमागचा प्रमुख उद्देश आहे. सरकारने या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना एकूण 16 हफ्त्यांच्या माध्यमातून निधी दिलेला आहे. या योजनेसाठी अर्ज करणे फारच सोपे आहे.
अर्ज नेमका कसा करावा?
>>>> पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी सर्वांत अगोदर तुम्हाला https://pmkisan.gov.in/ या केंद्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
>>>> या संकेतस्थळावर गेल्यानंतर फार्मर्स कॉर्नर या पर्यायात जाऊन न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या पर्यायाला क्लिक करावे लागेल.
त्यानंतर स्क्रीनवर एक नवे पेज उघडले जाईल. नव्या पेजवआधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाकावे. त्यानंतर राज्याची निवड करावी.
>>>> ही माहिती भरून झाल्यानंतर क्रप्चा कोड टाकावा. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. तो ओटीपी टाकावा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याचे रिजस्ट्रेशन होईल.
>>>> ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या क्रीनवर एक नवे उघडले जाईल. या नव्या पेजवर दिलेली संपूर्ण माहिती भरावी. ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमचा पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेसाठीचा अर्ज पूर्ण होईल. त्यानंतर तुम्ही पात्र की अपात्र हे नंतर पडताळणी करून ठरवले जाईल.
दरम्यान, या योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना लवकरच 18 वा हफ्ता मिळणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आफली ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी ती करून घेण्याचे आवाहन केले जात आहे.
हेही वाचा :
PM Kisan Yojana : खूशखबर! शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये, पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता जमा