नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Nidhi Yojana) 17 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता जारी केला असून शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 17 वा हप्ता जारी केला आहे. यामुळे सुमारे 9.3 कोटी शेतकऱ्यांना 17 व्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे. 


शेतकऱ्यांसाठी खूशखबर


आज पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 17 वा हफ्ता जारी केला आहे. पीएम किसानच्या सतराव्या हप्त्याअंतर्गत सुमारे 20 हजार कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. त्याआधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दशाश्वमेध घाटावर प्रार्थना केली आणि काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली.


शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये


दरम्यान, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता जाहीर झाल्यानंतर, 17 व्या हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात आले नसल्याने अनेक शेतकरी चिंतेत आहेत. मात्र, पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे न मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदी पडताळणीचा अभाव. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदी पडताळणी केल्या नसतील त्यांना पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागेल.


पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता जमा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथून 'पीएम किसान सन्मान निधी'च्या 17 व्या हफ्ता जारी केला. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील 9.26 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटींहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. तर याआधी 9 कोटी शेतकऱ्यांना 16 व्या हप्त्याचा लाभ मिळाला होता.


9.26 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटी






आतापर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांना 3.04 लाख कोटींचा लाभ


पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता 28 फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आला, तेव्हापासून देशभरातील कोट्यवधी शेतकरी 17 व्या हप्त्याची वाट पाहत होते. आज सतरावा हप्ता रिलीज झाल्यानंतर त्यांची प्रतीक्षा संपली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. पीएम किसान अंतर्गत आतापर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांना 3.04 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत.