Business News : देशात दिवसेंदिवस महागाई (inflation) वाढत आहे. अनेक वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे. पुढच्या काळात देखील महागाई आणखी वाढणार असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, सध्या तुमच्याकडे जर घरी 50 लाख रुपये पडून आहेत. या 50 लाख रुपयांचे पुढील 20 वर्षांनी नेमकी किती किंमत असेल? याबाबतची माहिती पाहुयात. 


वाढत्या महागाईत गुंतवणूक महत्वाची 


आज एक वस्तू खरेदी करण्यासाठी 50 लाख रुपये लागतात. त्याला 20 वर्षांनी किती पैसे मिळतील? तसेच गुंतवणूक केल्यास किती नफा परतावा मिळेल, या संदर्भातील माहिती पाहुयात. सध्या देशात वेगानं महागाई वाढत आहे. काही दिवसांनी 1 लाख रुपयांची किंमतही काही हजार रुपयांइतकी होईल. मागील 20 ते 25 वर्षापूर्वी ज्याच्याकडे 50 हजार रुपये आहेत तो स्वत:ला श्रीमंत म्हणत होता. आज अनेक लोकांना 50 हजार रुपये पगार आहे. आयटी कंपन्यांमध्ये असे बेसिक पॅकेज असते. म्हणूनच आज आपण महागाईच्या मापदंडांवर पुढील 20 वर्षांसाठी 50 लाख रुपये मोजल्यास ते किती पैसे होतील. 


20 वर्षांनी 50 लाख रुपयांचे किती मूल्य होणार?


 येत्या 20 वर्षात महागाई किती असेल? आणि मग तुम्हाला त्या स्केलवर 50 लाख रुपये ठेवावे लागतील. सध्या, जर आपण सरासरी 5 टक्के महागाई दर गृहीत धरला, तर पुढील 20 वर्षानंतर 50 लाख रुपयांचे मूल्य 1 कोटी 32 लाख रुपये होईल. म्हणजेच आज तुम्ही आलिशान कार घेण्यासाठी 50 लाख रुपये खर्च करता. पुढील 20 वर्षांत त्याची किंमत सुमारे 1.3 कोटी रुपये असेल. लक्षात ठेवा की आम्ही सरासरी 5 टक्के महागाई गृहीत धरून ही गणना केली आहे. महागाई वाढली तर त्याची किंमतही वाढू शकते. तर त्यात घट झाली तर कमी होईल.


सध्या देशात महागाईचा जोर वाढतोय


सध्या देशात महागाईचा जोर वाढत आहे. नियोजन करुन गुंतवणूक केली तर तुमचे भविष्य सहज सुरक्षित करता येईल, पण गुंतवणूक कुठे करायची हा प्रश्न आहे. या विषयावर तज्ज्ञांची वेगवेगळी मते आहेत. काहीजण पीपीएफ, एफडी सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात, तर काही एसआयपी म्युच्युअल फंड, एनपीएस सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याबद्दल बोलतात. बाजाराशी जोडलेले असूनही, या योजना सरासरी 10 ते 12 टक्के परतावा देतात आणि चक्रवाढीच्या मदतीने पैसा वेगाने वाढतो. या योजनांच्या मदतीने दीर्घ मुदतीसाठी करोडो रुपयांचा निधी जोडला जाऊ शकतो. 


महत्वाच्या बातम्या:


गुंतवणुकीच्या 'या' फॉर्म्यूल्याचा विषय खोल, डोकं लावल्यास तुम्हीही व्हाल करोडपती!