मुंबई : मुंबई महापालिकेच्या हद्दीत मालमत्तांची नोंदणी एक वर्षापूर्वीच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये तीन टक्क्यांनी घसरली आहे. ऑक्टोबरमध्ये मुंबईत 8 हजार 276  घरांची नोंदणी झाली आहे. नाइट फ्रँक इंडियाने सोमवारी याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे. रिअल इस्टेट कन्सल्टन्सी नाईट फ्रँक इंडियाच्या  (Knight Frank India) अहवालात सांगण्यात आले आहे की, सणासुदीत मागणी असूनही मालमत्तेची विक्री कमी झाल्यामुळे नोंदणीत घट झाली आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबई शहरात (BMC) मालमत्तांची नोंदणी 8,576 घरे इतकी होती. यातून राज्याला 705 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे, असंही या अहवालात सांगण्यात आले आहे. 

याआधी 2022 या वर्षात जानेवारीमध्ये सर्वात कमी घरांची नोंदणी झाली होती. जानेवारीत 8 हजार 155 घरांची नोंदणी झाली होती. जी ऑक्टोबर 2022 मध्ये नोंदवण्यात आलेल्या घरांच्या संख्येपेक्षा कमी आहे. यातच सप्टेंबरमध्ये मुंबईत 8 हजार 628 घरांची नोंदणी करण्यात आली. जी  जी ऑक्टोबर 2022 च्या तुलनेत अधिक आहे.  

ऑक्टोबर महिन्यासाठी मुंबई शहर मालमत्ता विक्री नोंदणी
 

Month

Property sale registrations (Units)

MoM change

YoY change

Oct-13

4,902

19%

 

Oct-14

4,483

-6%

-9%

Oct-15

5,225

9%

17%

Oct-16

6,068

37%

16%

Oct-17

5,668

-1%

-7%

Oct-18

6,377

8%

13%

Oct-19

5,811

44%

-9%

Oct-20

7,929

42%

36%

Oct-21

8,576

10%

8%

Oct-22

8,276

-4%

-3%

Source: Maharashtra Govt- Dept. of Registrations and Stamps (IGR); Knight Frank India Research

मुंबईत 10 महिन्यांच्या कालावधीत (जानेवारी - ऑक्टोबर, 2022) मालमत्ता नोंदणीने 10 वर्षांत पहिल्यांदा 100,000 घरांच्या नोंदणीचा टप्पा गाठला आहे. जानेवारी ते ऑक्टोबर 2022 दरम्यान 1,03,557 घरांची नोंद करून मालमत्ता नोंदणी 9 टक्क्यांनी वाढली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, राज्याच्या महसुलातही 53 टाक्यांनी वार्षिक वाढ झाली आहे. यातून गेल्या 10 वर्षात राज्य सरकाराला सर्वोत्तम 7,300 कोटी महसूल प्राप्त झाला आहे. 

नाईट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष शिशिर बैजल याबाबत बोलताना म्हणाले आहेत की, दिवाळी 2020 व्यतिरिक्त, ज्यामध्ये मुद्रांक शुल्कात कपात करण्यात आली होती, दिवाळी 2022 हा मुंबई शहरातील निवासी विक्रीसाठी दुसरा-सर्वोत्तम सण हंगाम होता. गृहकर्जाचे वाढलेले व्याजदर आणि मालमत्तेच्या किमती या आव्हानांना न जुमानता ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात घरांची खरेदी केली आहे.