नवी दिल्ली : प्रत्येक नागरिकाला त्याचं स्वत:चं घर असावं असं वाटतं. घरांच्या किमती खूप असल्यानं बँकांकडून गृहकर्ज घ्यावं लागतं. अनेकदा काही लोक महत्त्वाची माहिती न घेता गृहकर्ज घेतात यामुळं ते कर्ज त्यांच्यासाठी आर्थिक दडपण ठरते. काही जण घराच्या किमतीपेक्षा अधिक रक्कम व्याजापोटी भरतात. त्यामुळं गृहकर्ज घेताना कोणत्या चुका टाळाव्यात हे जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

आपण जेव्हा बँकांकडे गृहकर्ज घ्यायला जातो, तेव्हा बँका जितक्या अधिक कालावधीचं कर्ज देतात, त्यामुळं कर्जदारांना अधिक व्याज भरावं लागतं. यामुळं गृहकर्ज घेताना कमी कालावधीसाठी घ्यावं. 15 ते 20 वर्षांमध्ये गृहकर्जाची परतफेड करावी. कमी ईएमआयच्या नादात अधिक व्याज भरावं लागू शकतं. उदा. 50 लाखांचं गृहकर्ज 8 टक्क्यांनी घेतल्यास मासिक हप्ता  41800 रुपये होतो. 20 वर्षात परतफेड करणारी रक्कम मुद्दल आणि व्याज मिळून 1 कोटी रुपये रक्कम होते.

तुम्ही कर्जाचा कालावधी 30 वर्षांसाठी काढता, त्यावेळी ईएमआय 36700 रुपये होईल. व्याज दर कायम राहिल्यास 8 टक्क्यांनी कर्ज असल्यासं 50 लाख आणि 82 लाख रुपये व्याज द्यावं लागेल.  क्रेडिट इतिहास चांगला असल्यास बँका गृहकर्ज देताना प्राधान्य देतात, त्यांना चांगल्या ऑफर दिल्या जातात. जे लोक प्रामाणिकपणे आणि वेळेवर कर्ज भरतात त्यांना बँकांकडून चांगल्या ऑफर मिळतात. क्रेडिट इतिहासावरच नव्या कर्जाचे व्याज दर निश्चित होणार आहेत. ज्यांचा क्रेडिट इतिहास चांगला नसेल त्यांना अधिक व्याजदरानं कर्ज देतात.

Continues below advertisement

गृहकर्ज फिक्स इंटरेस्ट रेट आणि फ्लोटिंग इंटरेस्ट रेट यापैकी गृहकर्ज घेताना कोणतं घ्यावं या संदर्भात तज्ज्ञांच्या मते फ्लोटिंग व्याज दर आरबीआयच्या रेपो रेटवर अवलंबून असतो. काही तज्ज्ञांच्या मते अनेकदा फिक्स व्याज दर 10 टक्क्यांपेक्षा अधिक असतो त्यामुळं बहुतांश कर्जदार फ्लोटिंग व्याज दराला प्राधान्य देतात. 

गृहकर्जाचं प्रीपेमेंट करताना कशाची दक्षता घ्यावी?

गृहकर्जाचं प्रीपेमेंट म्हणजे 20 वर्षांसाठी कर्ज घेतल्यानंतर तुमच्याकडे बोनस आणि इतर उत्पन्नातून रक्कम मुद्दलात भरल्यास कर्जाचा कालावधी आणि व्याज वाचेल. प्रीपेमेंटमुळं व्याजाची रक्कम कमी द्यावे लागते. 

छुप्या शुल्कांपासून सावधान

कर्ज काढायला जाता तेव्हा काही जण घर घेतात, गाडी घेतात. घरासाठी कर्ज काढत असता तेव्हा तुम्ही बँकांकडून प्रोसेसिंग फी संर्भातात माहिती आवश्यक आहे. अनेकदा छुपे शुल्क लिहिलेलं असतं. त्याची माहिती घेणं आवश्यक आहे. कर्ज काढल्यानंतर ते वेळेपूर्वी बंद करण्यासाठी प्रोसेसिंग फी वेगवेगळी असते बँकांची त्यामुळं त्याची देखील माहिती घ्यावी.