Next week IPO : दलाल स्ट्रीटमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून खळबळ उडाली आहे. वास्तविक, अनेक कंपन्या त्यांचे प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) जारी करत आहेत आणि नंतर स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध होत आहेत. 20 डिसेंबरपासून सुरू होणारा आठवडा ही याला अपवाद नाही कारण या काळात 5 कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड होणार आहेत. या पाच कंपन्यांमध्य मॅपमायइंडिया, श्रीराम प्रॉपर्टीज, मेट्रो ब्रँड्स, मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेस आणि डेटा पॅटर्नचा समावेश आहे.
मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार 20 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान तीन IPO देखील खुला होणार आहेत. यामध्ये व्हिवो कोलॅबोरेशन (Vivo Collaboration Solutions), सीएमएस इन्फो सिस्टीम (CMS Info Systems) आणि ब्रँडबकेट मीडिया टेक्नोलॉजी ( Brandbucket Media & Technology ) चे IPO समाविष्ट आहेत.
मॅप माय इंडिया (MapMyIndia) -
मॅपमायइंडियाला ऑपरेट करणारी कंपनी सीई इंफो सिस्टीम्सचा आयपीओ 9 डिसेंबर रोजी उघडला आणि 13 डिसेंबर रोजी बंद झाला. ही कपंनी मॅपमायइंडियाला लोकेशन आणि नेव्हिगेशन सेवा संचालित करते. या कंपनीच्या IPO ला चांगला प्रतिसाद मिळाला आणि तो जवळपास १५५च्या पटीने सबस्क्राईब झाला.. 22 डिसेंबर रोजी शेअर बाजारात लिस्ट होणार आहे.
श्रीराम प्रॉपर्टीज (Shriram Properties) -
बेंगळुरूस्थित रिअल इस्टेट कंपनी श्रीराम प्रॉपर्टीजचा IPO ८ डिसेंबरला उघडला आणि १० डिसेंबरला बंद झाला. तो 4.6 च्या पटीने सबस्क्राईब करण्यात आला. 20 डिसेंबरला हा शेअर बाजारात लिस्ट होणार आहे.
मेट्रो ब्रँड (Metro Brands) -
पादत्राणे किरकोळ विक्रेते असलेला मेट्रो ब्रँड्सचा IPO 10 ते 14 डिसेंबर दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. हा देखील 3.64 पटीने सबस्क्राईब झाला. कंपनी 22 डिसेंबर शेअर बाजारात लिस्ट होताना आता हा काय कमाल करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मेडप्लस (MedPlus) -
भारतातील दुसरी सर्वात मोठी फार्मसी रिटेलर मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेस लिमिटेडचा IPO 13 ते 15 डिसेंबर या कालावधीत सदस्यत्वासाठी खुला होता. जो 52.6 पटीने सबस्क्राईब करण्यात झाला. आता 23 डिसेंबरला हा शेअर बाजारात लिस्ट होणार आहे.
डेटा पॅटर्न (Data Patterns) -
डेटा पॅटर्न (इंडिया) लि कपंनी संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रांना इलेक्ट्रॉनिक प्रणाली पुरवणारी कंपनी आङे. हा आयपीओ 14 ते 16 डिसेंबर या कालावधीत सबस्क्रिप्शन साठी खुला होता. हा आयपीओ तर 119 च्या पटीने सबस्क्राईब झाला. 24 डिसेंबरला हा शेअर बाजारात लिस्ट होणार आहे.