HDFC Bank: देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक HDFC ने आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. तिसऱ्या तिमाहीत बँकेच्या नफ्यात मोठी वाढ (Hdfc bank net profit) झाल्याचे समोर आले आहे. तिसऱ्या तिमाहीत  HDFC बँकेला 33.5 टक्क्यांच्या वाढीसह 16,372 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 12,259 कोटी रुपये होता.


ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत बँकेत ठेवी किती?


ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत HDFC बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 28,470 कोटी रुपये होते. जे गेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 22,990 कोटी रुपये होते. तिसऱ्या तिमाहीत, HDFC बँकेचा एकूण NPA 1.26 टक्के होता, जो गेल्या वर्षी 1.23 टक्के होता. तर निव्वळ एनपीए 0.31 टक्के आहे, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 0.33 टक्के होता. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत, HDFC बँकेच्या ठेवी 28.47 लाख कोटी रुपये होत्या. त्यात 27.7 टक्के वाढ झाली आहे, तर आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसर्‍या तिमाहीत ती 22.29 लाख कोटी रुपये होती. चालू खात्यातील ठेवी 5.79 लाख कोटी रुपये आहेत तर बचत खात्यातील ठेवी 2.58 लाख कोटी रुपये आहेत.


एचडीएफसी बँकेचे शेअर्स 0.38 टक्क्यांच्या वाढीसह 1679 रुपयांवर बंद


एचडीएफसी बँक आणि गृहनिर्माण वित्त कंपनी एचडीएफसीच्या विलीनीकरणानंतर, एचडीएफसी बँकेने नवीन फॉर्ममध्ये आर्थिक निकाल जाहीर केल्याची ही दुसरी तिमाही आहे. मात्र, एचडीएफसी बँकेचे तिमाही निकाल शेअर बाजाराच्या बाजूने आहेत की नाही हे बुधवारी बाजार उघडल्यावरच कळेल. कारण मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर HDFC बँकेचे निकाल जाहीर झाले आहेत. चांगल्या परिणामांच्या आशेने, HDFC बँकेच्या शेअरमध्ये गेल्या तीन महिन्यांत चांगली वाढ झाली आहे. स्टॉक 10 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. 26 ऑक्टोबर 2023 रोजी शेअर 1460 रुपयांच्या पातळीवर घसरला होता. या स्तरावरून समभागाने चांगली रिकव्हरी दाखवली आहे. मंगळवारी बाजार बंद असताना, एचडीएफसी बँकेचे शेअर्स 0.38 टक्क्यांच्या वाढीसह 1679 रुपयांवर बंद झाले. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये झालेल्या जोरदार वाढीमुळे अलीकडेच बँक निफ्टी लाइफटाइम 48636 च्या पातळीला स्पर्श करण्यात यशस्वी ठरला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


HDFC Life : प्रभावी संपत्ती हस्तांतरण आणि मालमत्ता व्यवस्थापनासाठी एचडीएफसी लाईफ क्लिक 2 प्रोटेक्ट सुपर प्लॅन