GST Collection : भारतासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. देशाच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे. एप्रिलमध्ये (April) भारताचे जीएसटी संकलन (GST Collection) विक्रमी 2.37 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जे गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील 2.10 लाख कोटी रुपयांपेक्षा 12.6 टक्क्यांनी जास्त आहे. जीएसटी संकलनात झालेली वाढ ही सरकारने ठरवलेल्या कायदे आणि प्रणालींचे पालन यामुळं झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आतापर्यंतचा सर्वाधिक जीएसटी संग्रह
भारत सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2024 मध्ये जीएसटी संकलन (GST Collection) 2.10 लाख कोटी रुपये होते. 1 जुलै 2017 रोजी नवीन कर प्रणाली लागू झाल्यानंतरचा हा दुसरा सर्वाधिक जीएसटी संग्रह होता. या वर्षी एप्रिलमध्ये, देशांतर्गत व्यवहारांमधून जीएसटी संग्रह 10.07 टक्क्यांनी वाढून 1.9 लाख कोटी रुपये झाले आहे. तर आयात केलेल्या वस्तूंवरील कर 20.8 टक्क्यांनी वाढून 46913 कोटी रुपये झाला आहे. एप्रिल महिन्यात जारी केलेल्या परताव्याच्या रकमेत 48.3 टक्क्यांनी वाढ होऊन ती 27341 कोटी रुपये झाली आहे.
सरकारी तिजोरीत भर
या वर्षी मार्चमध्ये जीएसटी संकलन गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 9.9 टक्क्यांनी वाढून 1.96 लाख कोटी रुपये झाले. या वर्षी फेब्रुवारीमध्ये नोंदवलेल्या 1.84 लाख कोटी रुपयांच्या कर संकलनापेक्षा टप्प्याटप्प्याने जीएसटी संकलन 6.8 टक्के जास्त होते. मार्चमधील एकूण जीएसटी महसुलात सीजीएसटी (केंद्रीय जीएसटी) मधून 38100 कोटी रुपये, राज्य जीएसटीमधून 49900 कोटी रुपये, एकात्मिक जीएसटीमधून 95900कोटी रुपये, भरपाई उपकरातून 12300 कोटी रुपये समाविष्ट होते.
'या' पाच राज्यांनी भरला सर्वाधिक कर
फेब्रुवारीमध्ये सीजीएसटी संकलन 35204 कोटी रुपये, राज्य जीएसटी 43704 कोटी रुपये, एकात्मिक जीएसटी 90870 कोटी रुपये आणि भरपाई उपकर 13868 कोटी रुपये होता. मार्चमध्ये जीएसटी संकलनात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश हे पहिल्या पाच राज्यांमध्ये होते. महाराष्ट्राने मार्चमध्ये 34534 कोटी रुपये दिले, जे गेल्या वर्षीच्या मार्चपेक्षा 14 टक्के जास्त आहे.
कर्नाटकातून जीएसटी संकलन 13497 कोटी रुपये झाले, जे वार्षिक आधारावर 4 टक्क्यांनी वाढले आहे. गुजरातने 12095 कोटी रुपये दिले, जे मार्च 2024 च्या तुलनेत 6 टक्क्यांनी वाढले आहे. तामिळनाडूने 11017 कोटी रुपये जीएसटी भरला, जो 7 टक्के जास्त आहे. उत्तर प्रदेशातून जीएसटी संकलन 9956 कोटी रुपये झाले, जे वार्षिक आधारावर 10 टक्क्यांनी वाढले आहे.
महत्वाच्या बातम्या: