GST Collection : जीएसटी (GST) लागू झाल्यापासून सरकारी तिजोरीत सतत वाढ होत आहे. आता सरकारने जीएसटी संकलनात (GST Collection) एक विक्रमही केला आहे. खरं तर, गेल्या आर्थिक वर्षात सरकारने विक्रमी जीएसटी संकलन केले आहे. विशेष म्हणजे गेल्या 5 वर्षांत सरकारचे हे संकलन दुप्पट झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात जीएसटी संकलनात आणखी वाढ होऊ शकते. सरकारने कर संकलनाचे आकडे जाहीर केले आहेत. पाहुयात याबाबत सविस्तर माहिती.
विक्रमी जीएसटी संकलन
पाच वर्षांत दुप्पट होऊन एकूण जीएसटी संकलन आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 11.37 लाख कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष 2024-25 -मध्ये 22.08 लाख कोटी रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये एकूण जीएसटी संकलन 22.08 लाख कोटी रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले, जे मागील आर्थिक वर्षापेक्षा 9.4 टक्के जास्त आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांत वार्षिक आधारावर हे संकलन जवळजवळ दुप्पट झाले आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये सरासरी मासिक संकलन 1.84 लाख कोटी रुपये होते, जे 2023-24 मध्ये 1.68 लाख कोटी रुपये आणि 2021-22 मध्ये 1.51 लाख कोटी रुपये होते. तज्ञांच्या मते, येत्या काळात हे मासिक सरासरी संकलन 2 लाख कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचू शकते.
करदात्यांची संख्या दुप्पट झाली
जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत करदात्यांची संख्या 2017 मध्ये 65 लाखांवरून आठ वर्षांत 1.51 कोटींहून अधिक झाली आहे. जीएसटीच्या आठ वर्षांवरील सरकारी निवेदनात म्हटले आहे की, जीएसटीच्या अंमलबजावणीपासून, महसूल संकलनात आणि कर पायाचा विस्तार करण्यात मोठी वाढ झाली आहे. यामुळे भारताची आर्थिक स्थिती सतत मजबूत झाली आहे आणि अप्रत्यक्ष कर अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक बनला आहे. 2024-25 मध्ये जीएसटीने 22.08 लाख कोटी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वाधिक सकल संग्रह नोंदवला, जो वार्षिक आधारावर 9.4 टक्के वाढ आहे. दिवसेंदिवस जीएसटी संकलनात मोठी वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. या वाढीमुळ देशाच्या तिरोजीत देखील मोठी भर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. जीएसटी संकलनाने गेल्या पाच वर्षाचा विक्रमही मोडित काढला आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 11.37 लाख कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष 2024-25 -मध्ये 22.08 लाख कोटी रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये एकूण जीएसटी संकलन 22.08 लाख कोटी रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले, जे मागील आर्थिक वर्षापेक्षा 9.4 टक्के जास्त आहे.
महत्वाच्या बातम्या: