Vodafone Idea Shareholders: व्होडाफोन आयडीयाची (Vodafone Idea) भारत सरकारची सर्वात मोठी भागीदारी असणार आहे. बोर्डानं कंपनीच्या लायबिलिटीला इक्विटीमध्ये रुपांतरीत करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलीय. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार,  व्होडाफोन आयडियामध्ये सरकारची सर्वाधिक 35.8 टक्के भागीदारी असेल. तर, व्होडाफोन ग्रुप पीएलसीकडं (Vodafone Group Plc) 28.5 टक्के आणि आदित्य बिर्ला ग्रुपची (Aditya Birla Group) 17.8 टक्के भागीदारी असणार आहे. 


सरकारने काही दिवसांपूर्वी दूरसंचार क्षेत्राला दिलासा देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. सरकारनं स्पेक्ट्रम शुल्क आणि एजीआर थकबाकी भरण्यासाठी 4 वर्षांची स्थगिती दिली. मात्र, या काळात व्याजाची मोजणी सुरू राहील. जर कंपनीला व्याजाचा काही भाग इक्विटीमध्ये बदलायचा असेल तर सरकारनं त्याला मान्यताही दिली होती. सरकारच्या या निर्णयानुसार, व्होडाफोन आयडिया लिमिटेडच्या बोर्डाने ड्यूचे इक्विटीमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतलाय.


ट्वीट-



इक्विटी रूपांतरणानंतर  सरकारचा सर्वाधिक हिस्सा असेल. अशा स्थितीत ही कंपनी सरकारी होणार का अन्य कोण तिचं काम पाहणार? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. व्होडाफोन आयडियाच्या वतीने असं सांगण्यात आलंय की, सरकार आणि प्रमोटर यांच्यातील गव्हर्नन्सचे काम शेअर होल्डर अॅग्रीमेंट (SHA) अंतर्गत केले जाईल. प्रमोटर्स राइटसाठी शेअरहोल्डिंग मर्यादा 21 टक्क्यांवरून 13 टक्क्यांपर्यंत कमी केली जाईल. यासाठी कंपनीच्या आर्टिकल ऑफ असोसिएशन (AoA) मध्ये बदल केले जातील, अशी माहिती समोर येत आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-