Gold Rate on 20 February मुंबई : भारतात सोने आणि चांदीचे दर सातत्यानं वाढत आहेत. चांदीच्या दरानं 1 लाखांच्या दिशेनं वाटचाल सुरु केली आहे.  एक तोळे सोनं 90 हजारांच्या जवळपास पोहोचलं आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या दरानं  86500 रुपयांजवळ झेप घेतली आहे. चांदीचा दर देखील 97 हजारांचा टप्पा पार करु शकतो.  आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. 

सोने वायद्याचे दर वाढले

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरामध्ये तेजी पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंवर एप्रिलच्या वायद्याच्या सोन्याच्या दरात 510 रुपयांची वाढ होऊन सोनं 86420 रुपयांवर पोहोचलं आहे. एमसीएक्सवर सोन्याचे दर 86488 रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर त्यामध्ये छोटी घसरण झाली होती. एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा दर 86592 रुपयांपर्यंत पोहोचला होता. 

चांदीच्या दरात तेजी

चांदीच्या वायद्यांमध्ये देखील तेजी पाहायला मिळाली. एमसीएक्सवर चोंदीच्या दरात 391 रुपयांची तेजी पाहायला मिळाली. बाजार सुरु झाला तेव्हा चांदीचे दर 96797 रुपयांवर होते. बातमी लिहीपर्यंत चांदीचे दर 97037 रुपयांपर्यंत पोहोचले होते. सोन्याच्या दरानं 97197 रुपयांवर पोहोचला होता. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चांदीच्या दरात तेजी

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली. कॉमेक्सवर सोन्याचा दर 2949.50 डॉलर प्रति औंस वर सुरु झाला. कालचा बाजार बंद झाला तेव्हा सोन्याचा दर 2936.10 डॉलर प्रति औंस इतका आहे. सोन्याचा कॉमेक्सवरील सोने दराचा उच्चांक 2957.90 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. चांदीच्या दराचा वायदा 33.15 डॉलरच्या भावावर खुला झाला होता.  

सोन्याचा दर किती? 

चेन्नई, बंगळुरु, मुंबई, पुणे, कोलकाता, हैदराबाद या शहारंमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 88040 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 80700 रुपये 10 ग्रॅम इतका आहे. 

देशाची राजधानी नवी दिल्लीत 24  कॅरेट सोन्याचा दर 88190  इतका आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 80850 रुपये इतका आहे. नवी दिल्लीत सोनं  इतर शहरांच्या तुलनेत महाग आहे. 

अहमदाबाद आण इंदोरमध्ये  22 कॅरेट सोन्याचे दर सारखे आहेत. 800750 रुपयांना  22 कॅरेट सोनं या शहरांमध्ये उपलब्ध होईल. तर, अहमदाबाद शहरात 24 कॅरेट एक तोळे सोनं  88050 रुपयांना मिळतेय. तर, इंदोरमध्ये 88090 रुपयांना 24 कॅरेट सोनं मिळतंय. लखनौ शहरात 22 कॅरेट सोन्याचा एक तोळ्याचा दर 80850 रुपये इतका आहे. तर,  24 कॅरेट सोन्याचा दर 88190 रुपये इतका आहे. 

इतर बातम्या :