Gold Silver Rate : सोनं चांदी (Gold Silver) खरेदी करणाऱ्या ग्राहकांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. आज पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. यामुळं आता सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? असा सवाल नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे. दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
सोनं 400 रुपयांनी तर चांदी 600 रुपयांनी महाग
जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतील. वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत कमालीची वाढ झाली आहे. एमसीएक्सवर शुक्रवारी सोने सुमारे 400 रुपयांनी महागले आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात 600 रुपयांची वाढ दिसून येत आहे.
सध्या सोन्याचा दर काय?
MCX मधील सोन्याच्या किमतींमध्ये म्हणजेच फ्युचर्स मार्केटमध्ये आज 13 सप्टेंबर रोजी प्रचंड वाढ दिसून आली. त्यात कालच्या तुलनेत 425 रुपयांची वाढ झाली आहे. आज सोन्याचा दर हा 73,249 रुपये प्रति 10 ग्रॅमचा भाव पोहोचला आहे. गुरुवारी स्थानिक बाजारात सोने 72,824 रुपयांवर बंद झाले होते.सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. फ्युचर्स मार्केटमध्ये चांदीची किंमत 667 रुपयांनी वाढून 87762 रुपयांवर पोहोचली आहे.
कोणत्या शहरात सोन्याला किती दर?
दिल्ली - 74600मुंबई - 74450चेन्नई - 74450कोलकाता - 74450अहमदाबाद - 74450लखनौ - 74600बंगळुरु - 74450पटणा - 74500हैदरबाद - 74450जयपूर - 74450
सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता कारण...
दरम्यान, एका बाजूला राष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या दरात वाढ होतक असताना दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळं लोकांना सोन्याची खरेदी करणं परवड नाही. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या काळात आमकी सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी काळात मौल्यवान धातूंच्या (सोने आणि चांदी) किंमती वाढू शकतात, असे जाणकारांचे मत आहे. येत्या काही दिवसांत अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात केली जाऊ शकते, त्याचा फायदा सराफांना होऊ शकतो. लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने येत्या काही दिवसांत देशांतर्गत बाजारात नवीन मागणी येऊ शकते. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं सर्वसामान्य लोकांना सोन्या चांदीची खरेदी करणं देखील अवघड झालं आहे.
महत्वाच्या बातम्या:
Gold Prices : सणासुदीचा काळ आणि लग्नाचा हंगाम, सोनं वाढणार; यंदा किमतीचा रेकॉर्ड ब्रेक होणार