नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात तेजी आणि घसरण सुरु आहे. सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. अमेरिका आणि इराण यांच्यातील थांबण्याची चिन्हं दिसत नसल्यानं गुंतवणूकदार पुन्हा सोने आणि चांदी सारख्या सुरक्षित पर्यायाकडे वळत आहेत. चांदीच्या दरानं जानेवारी महिन्यात 4 लाखांचा टप्पा पार केला होता. त्या तुलनेत चांदी सध्या 2 लाख रुपयांनी स्वस्त उपलब्ध होत आहे. तर, सोन्याचे दर देखील उच्चांकाच्या तुलनेत कमीच आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीदरम्यान काही दिवसांमध्ये चांदीच्या दरात तेजी तर काही दिवशी घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी 5 मेला संपणाऱ्या वायद्याच्या चांदीचा दर 227750 रुपये किलोवर होता.20 मार्चला हाच दर 226772 रुपये होता म्हणजे चांदी चार दिवसात एमसीएक्सवर 978 रुपयांनी वाढला आहे. एमसीएक्सवरील चांदीच्या दराच्या उच्चांकाचा विचार केला तर एक किलोचा दर 439337 रुपये किलो होता, त्या तुलनेत सध्या दर 211587 रुपयांनी स्वस्त आहे.
सोन्याच्या दराचा विचार केला तर 20 मार्चला 2 एप्रिलच्या वायद्याचा सोन्याचा दर 147987 रुपये 10 ग्रॅम होता. त्या तुलनेत 27 मार्चला सोन्याचा द 147270 रुपये होता. म्हणजेच एमसीएक्सवर चार दिवसांमध्ये सोनं 717 रुपयांनी स्वस्त झालं आहे. सोन्याच्या उच्चांकाचा विचार केला असता 202984 रुपये 10 ग्रॅम होता, त्या तुलनेत सोनं सध्या 55714 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.
देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीचा दर
देशांतर्गत बाजाराचा विचार केल्यास सोने आणि चांदीचे दर आयबीजेए डॉट कॉमकडून जारी केले जातात. आठवड्यात चार दिवसात 10 ग्रम सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं दिसून आलं. सोन्याचा दर सुरुवातीला 147218 रुपयांवर होता. त्यात घसरण होऊन सोन्याचा दर 142942 रुपयांवर आला आहे. म्हणजे चार दिवसात सोन्याच्या दरात 4276 रुपयांची घसरण झाली आहे. दुसरीकडे चांदीचा विचार केला असता 232364 रुपयांवर असलेल्या चांदीचा 10717 रुपयांनी कमी होऊन 221647 रुपयांवर आला आहे.
आयबीजेएकडून जारी करण्यात आलेल्या दरांनुसार 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 142942 रुपये इतका आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 139510 रुपये आहे.20 कॅरेट सोन्याचा दर 127220 रुपये 10 ग्रॅम इतका आहे. तर, 18 कॅरेट सोन्याचा दर 115780 रुपये तोळा आणि 14 कॅरेट सोन्याचा द 92220 रुपये तोळा इतका आहे.
दरम्यान, आयबीजेएकडून जारी केले जाणारे सोने आणि चांदीचे दर देशभर सर्वत्र सारखेच असतात. मात्र, दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जीएसटी आणि मेकिंग चार्जेस द्यावे लागतात. मेकिंग चार्जेस वेगवेगळ्या शहरात वेगळे असू शकतात. त्यामुळं सोने आणि चांदीचे दर वेगवेगळ्या शहरात वेगळे असतील.
