Umesh Kamat and Priya Bapat: मराठी मनोरंजनसृष्टीत कायम चर्चेत राहणारे कपल म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट (Umesh and priya). हे जोडपं हटके कपलपैकी एक आहे. या कपलने आतापर्यंत अनेक वेबसिरीज आणि चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. हे कपल सोशल मीडियातही सक्रीय असते. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. दरम्यान, उमेश आणि प्रियाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी.  दोघेही लवकरच वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दोघांची 'आणि काय हवं?' ही वेब सिरीज प्रचंड गाजली. आता त्यांचा आगामी वेब मालिका 'हे काय नवीन?' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वेब मालिकेच्या प्रोमोशनदरम्यान, प्रियाने उमेशसोबतच्या नात्यामधील पर्सनल गोष्ट शेअर केली आहे. 

Continues below advertisement

'आणि काय हवं?' या लोकप्रिय सिरीजनंतर 'हे काय नवीन?' ही वेब मालिका घेऊन प्रिया आणि उमेश प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या वेब मालिकेच्या प्रोमोशनसाठी या जोडप्यानं एबीपी माझाला मुलाखत दिली. तसेच  मुलाखतीत वेब सिरीजच्या निगडीत अनेक किस्से शेअर केले. दरम्यान, या मुलाखतीत प्रियानं उमेशसोबतच्या नात्यामधील पर्सनल गोष्टही शेअर केली आहे.  प्रिया म्हणाली, 'खूप पर्सनल गोष्ट आज मी शेअर करत आहे.  ही खरंतर खूप छोटी गोष्ट आहे. ही गोष्ट मी लहानपणापासून करत आले आहे.  आधी आईबरोबर करत होते आणि आता उमेशसोबत करत आहे'.

 

Continues below advertisement

'मला जर खूप त्रास होत असेल आणि मी खूप चिडले असेन तर, तेव्हा मला असं वाटतं की, उमेशने मला आता जवळ घ्यावं आणि समजवावं. असं काही झालं तर,  Till Date मी म्हणत राहते की, आता मी कधीच तुझ्याकडे येणार नाही. तू पण माझ्याकडे कधीच येऊ नको. तू माझ्याकडे बघू पण नको.  पण त्याला हे माहिती आहे की, मी जेव्हा असं त्याला म्हणते,  खरंतर त्यानं माझ्याजवळ येऊन मला मिठी मारणं अपेक्षित आहे.  एवढंच तो करतो', असं प्रिया म्हणाली. 

'उमेशच्या आयुष्यात अशा काही Moments येतात जेव्हा उमेश काहीच बोलत नाही. मी जसं व्यक्त होते, तसं तो व्यक्त होत नाही. मला त्याच्याकडे बघून कळतं की, आता त्याला गरज आहे की, मी काही न बोलता फक्त त्याच्यासोबत असणं', असं प्रिया मुलाखतीत म्हणाली. प्रिया आणि उमेशची ही वेब सिरीज लवकरच ZEE5वर प्रदर्शित होणार आहे. ही वेब सिरीज प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.