Gold Silver Rates:देशातील सोन्याचांदीच्या किमतींमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चढउतार दिसत आहे .  शनिवारी (6 सप्टेंबर ) 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी एक लाख 08 हजार रुपयांच्या पुढे गेला होता . आज विसर्जनानंतर 24 कॅरेटला ग्राहकांना 10 ग्रॅम  सोन्यासाठी 1 लाख 07 हजार 930 रुपये मोजावे लागतील . तर चांदीचा किलोमागे दर एक लाख 24 हजार 310 रुपये झाला आहे . 

देशात सोन्याच्या दराने ग्राहकांना झटका दिला असून गेल्या काही दिवसांपासून उच्चांकी भावाने सोनं खरेदी करावं लागत आहे . सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय . याशिवाय अमेरिकन टॅरिफ बद्दल जागतिक अनिश्चितता तसेच सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी पुन्हा एकदा वाढत असल्याचेही दिसत आहे .

विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर किती?

देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असताना दुसरीकडे सोन्या-चांदीच्या दारातही चढ-उतर सुरू आहेत . गणेश विसर्जना दिवशी म्हणजेच शनिवारी (6 सप्टेंबर ) रोजी 24 कॅरेट सोने प्रति ग्रॅम दहा हजार 849 रुपयांना विकले जात होते .तर दहा ग्राम सोन्याची किंमत 1 लाख 08 हजार 490 रुपये झाली होती . आज गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी (7 सप्टेंबर रोजी दहा ग्रॅम सोन्याचा (24 कॅरेट ) दर एक लाख 7 हजार 930 रुपये झाला आहे . तर 22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना 98 हजार 936 मोजावे लागत आहेत . चांदीचा एक किलो मागे दर हा एक लाख 24 हजार 310 झालाय . दहा ग्रॅम चांदीसाठी ग्राहकांना 1243 रुपये मोजावे लागतील 

सोने आणि चांदीवरील जीएसटीमध्ये कोणताही बदल नाही

सरकारने सोने आणि चांदीवरील 3 टक्के जीएसटीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. यामुळे, आता गुंतवणूकदारांचे लक्ष सप्टेंबरमध्ये होणाऱ्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीकडे आहे. यामध्ये व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा आहे. येथे, अमेरिकन टॅरिफबद्दल जागतिक अनिश्चिततेमध्ये, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी पुन्हा एकदा वाढत आहे.

आरबीआयचा सोने खरेदीकडे कल

गेल्या काही महिन्यांपासून आरबीआय अमेरिकन ट्रेझरी बिल्सऐवजी सोन्याकडे (Gold Investment) जास्त भर देत आहे. 27 जून 2024 ला भारताकडे 840.76 मेट्रिक टन सोने होते, तर 27 जून 2025 पर्यंत ते 879.98 मेट्रिक टनांवर पोहोचले.

देशभरात गणेशोत्सव सुरू असताना सोन्या-चांदीच्या भावात मोठा चढ-उतार पाहायला मिळत आहे. शनिवारी (6 सप्टेंबर 2025) सोन्याच्या दरानं ग्राहकांना मोठा झटका दिला होता. काल 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम ₹1 लाखांच्या पातळीवर पोहोचला होता, तर 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम ₹1 लाख 08 हजार रुपयांच्या पुढे गेले होते. पण रविवारी (7 सप्टेंबर) भाव स्थिर राहिले असून, पुण्यात आज 22 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम ₹98,936 तर 24 कॅरेट सोने ₹1,07,930 इतकं आहे.