मुंबई : बुधवारी वाढलेल्या सोन्या-चांदीच्या किंमती गुरुवारी बाजार बंद होताना पुन्हा काही प्रमाणात घसरल्या. मुंबई आणि पुण्यामध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये 200 रुपयांची घट झाली आहे. मुंबई आणि पुण्यात आज 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव हा 46,600 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,600 रुपये इतका आहे. तर चांदीच्या किंमतीत 1300 रुपयांची घसरण झाली असून एक किलो चांदीसाठी आता 71,400 रुपये मोजावे लागतील. एका दिवसापूर्वी सोन्याच्या भावात 800 रुपयांची तर चांदीच्या भावात 1500 रुपयांची वाढ झाली होती.
गेल्या काही दिवसांचा विचार करता स्थिर असलेले सोन्याचे भाव हे दोन दिवस झाले बदलत आहेत. 20 मे रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,000 रुपये होता, तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 47,000 हजार रुपये होता. त्यानंतर 21 मेपासून 26 मेपर्यंत सोन्याचे भाव स्थिर असल्याचं पाहायला मिळत होतं. बुधवारी अचानक त्यामध्ये तेजी आली आणि 800 रुपयांनी तो वधारला. आता आज पुन्हा त्यामध्ये 200 रुपयांची घट झाल्याचं पहायला मिळतंय.
बुधवारी चांदीचा दर हा 71,200 रुपये इतका होता. गुरुवारी त्यामध्ये तब्बल 1500 रुपयांची वाढ झाली असून ती किंमत 72,700 रुपयांवर पोहोचली होती. आता पुन्हा त्यामध्ये 1300 रुपयांची घट झाली असून आज एक किलो चांदीचा भाव हा 71,400 रुपये इतका आहे. चांदीच्या भावाचा विचार करता गेल्या दहा दिवसात या दरात चढ-उतार दिसत आहे. 16 मे रोजी चांदीचा दर प्रतिकिलो 71,000 हजार रुपये इतका होता. तर 18 मे रोजी तो प्रतिकिलो 74,000 हजारांवर पोहोचला. पुन्हा 19 मेपासून चांदीच्या दरात घट झाल्याचं पाहायला मिळालं. 19 मे रोजी प्रतिकिलो 73,000 रुपये, 20 मे रोजी प्रतिकिलो 72,300 रुपये, 21 मे रोजी प्रतिकिलो 71,200 रुपये, 22 मे प्रतिकिलो 71,100 रुपयांपर्यंत चांदीच्या दरात घट झाली. त्यानंतर 23 मे रोजी चांदीच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली, तर 24 मे रोजी चांदीच्या दरात 300 रुपयांची वाढ झाली होती. तर 25 आणि 26 मे रोजी चांदीच्या दरात 300 रुपयांची घट झाली होती.
मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास 11 हजारांहून जास्त रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.
महत्वाच्या बातम्या :
- Corona Vaccination : मुंबई महापालिकेच्या लसींच्या ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून पुरवठादाराची माघार; पालिकेच्या अडचणीत भर
- चंद्रपुरातील दारूबंदी उठविण्याच्या निर्णयाने नुकसानच आहे, निषेध व्हायलाच हवा- डॉ. अभय बंग
- Odisha Yaas Cyclone Update : ´यास´ दरम्यान ओडिशात 300 बालकांचा जन्म, काहींनी वादळावरुन केलं नामकरण