Gold Silver Price Today : सोन्याच्या आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ (Gold Price Today) झाल्याचे बघायला मिळालं आहे. सोन्याच्या दराने(Gold Price) जीएसटीसह (GST) 1,36,000 तर चांदीने ही 1,95,000 हजार रुपयांचा नवा उच्चांक गाठला असल्याचं जळगावच्या सुवर्ण नगरीत पाहायला मिळत आहे. अगोदरच डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झाली असताना, त्यात आता अमेरिकन फेडरल बँकांच्या व्याज दरात कपात करण्यात आल्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान एकाच दिवसात सोन्याच्या दरात 3000 हजार रुपयांची वाढ होऊन सोने 1,33,000 हजार वरून 1,36,000 हजार रुपयावर जाऊन पोहोचले आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात ही 10,000 रुपयांची वाढ होऊन, चांदीच्या दराने 1,95,000 हजार रुपयांची विक्रमी पातळी गाठली आहे.
पुढील काही दिवसात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात अजूनही वाढ होण्याचे संकेत सुवर्ण व्यावसायिकांनी दिले आहेत. तर गेल्या काही दिवसांत सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळालं आहे. बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे की, औद्योगिक मागणी वाढल्यामुळे चांदीचे दर वाढत आहेत. इलेक्ट्रिक वाहने, सेमीकंडक्टर, सोलर पॅनेल आणि इलेक्ट्रॉनिक्ससह इतर उद्योगांमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यामुळे मागणीत वाढ झाली आहे.
Gold Price Today : सोन्याचे दरही वाढले, पुन्हा 3 हजारांची वाढ
शुक्रवारच्या दिवशी सोन्याच्या किमतीतही मोठी वाढ दिसून आली. 5 फेब्रुवारी 2026 रोजी एक्सपायर होणारा सोन्याचा वायदा एमसीएक्सवर ₹1,32,275 वर उघडला. व्यापारी दिवसादरम्यान, सोन्याने ₹1,34,966 चा उच्चांक गाठला, जो मागील बंदपेक्षा अंदाजे ₹2.400 ने वाढ दर्शवितो. सोन्याच्या दरात सातत्यानं तेजी आणि घसरण सुरु असते. जगभरातील विविध घटानांचा प्रामुख्यानं युद्धजन्य परिस्थिती, रुपयाची कमजोर स्थिती, सरकारचा कर यामुळं सोन्याच्या दरावर परिणाम होत असतो. यामुळं सोन्याच्या दरात दररोज बदल होत असतो.
सोन्याचे दर वाढले तरी भारतीय ग्राहक सोन्याची खरेदी करण्यास प्राधान्य देतात. सोने खरेदी करणं भारतीय नागरिकांकडून शुभ मानलं जातं. त्यामुळं भारतात सणांच्या काळात सोन्याची खरेदी केली जाते. लग्न सराईच्या काळात सोन्याची मागणी अधिक वाढते. या दरम्यान सोने खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. 2025 मध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 31 डिसेंबर 2024 ला 24 कॅरेट सोन्याचे दर 75 हजारांवर होते. सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 36 हजारांवर पोहोचला आहे. म्हणजेच सोन्याच्या दरात 61 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
हे देखील वाचा