जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर आलेल्या आर्थिक मंदीचा परिणाम म्हणून सोन्याच्या मागणीत घट झाल्याने सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या आठवडा भरात सोन्याचा दरात तीन हजारांची तर चांदीच्या दरात पाच हजार रुपयांची घसरण झाल्याने जळगावच्या सुवर्ण नगरीत ग्राहकांनी सोने खरेदी साठी गर्दी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर आर्थिक मंदीचं सावट पसरले आहे. त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल काहीसा कमी झाल्याने सोन्याच्या मागणीत घट झाल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत ही घट झाल्याचं दिसून येत आहे
गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात सोन्याची किंमत 49,800 होती. ती आज 47,700 इतकी कमी झाली आहे. म्हणजेच तीन हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात ही पाच हजार रुपयांची घासरण झाली आहे. 75 हजार रुपये असलेली किंमत आज 70 हजार रुपये किलो झाली आहे. गेल्या तीन दिवसातच सोन्याच्या दरात पंधराशे रुपयांनी घट झाल्याचे सोने व्यावसायिकांनी म्हटल आहे.
मागील वर्षभर पासूनचा विचार केला तर सोन्याचे दर हे 58,000 हजार रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले होते. त्यामुळे सर्व सामान्य ग्राहकांच्या साठी ते परवडणारे नसल्याने सोने ग्राहकानी खरेदीकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले होते. मात्र गेल्या आठवड्या पासून कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने आणि लॉकडाऊन अनलॉक झाल्याने सोन्याच्या बाजार पेठा या सुरू झाल्या आहेत. त्यात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात झालेली घसरण पाहता अनेक ग्राहकांना ही संधी वाटू लागल्याने अनेक ग्राहकांनी सोने खरेदी साठी गर्दी केली असल्याचं पाहायला मिळत आहे.
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास आठ हजारांहून जास्त रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.
संबंधित बातम्या :