Gold Silver Price : सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price) सातत्यानं चढ उतार होत आहे. सध्या लग्नाचा हंगाम सुरु झाला आहे. दिवाळीचा सण संपताच लग्नसराई सुरु होते. दरम्यान, लग्नाचा हंगामा सुरु होताच सोन्या चांदीच्या दरात वाढ होताना पाहायला मिळत आहे. सोने वायदा बाजारात 61,074 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​उघडला. त्यानंतर त्याच्या किंमतीत आणखी वाढ झाली आहे. बुधवारच्या तुलनेत सोन्याचा भाव 117 रुपये म्हणजचे 0.19 टक्क्यांनी वाढून 61,141 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. बुधवारी सोन्याचा भाव 61031 रुपयांवर बंद झाला होता.


सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ (Gold Silver Price)


सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ होत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात चांदी 72,960 रुपये प्रति किलोच्या पातळीवर उघडली. त्यानंतर त्याच्या किमतीत किंचित वाढ दिसून आली आहे आणि ती कालच्या तुलनेत 131 रुपयांनी म्हणजेच 0.18 टक्के वाढीसह 72,957 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. काल चांदी 72,826 रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाली होती.


 लग्नसमारंभात सोन्या-चांदीचे दागिने देण्याचे विशेष महत्त्व


आजपासून (23 नोव्हेंबर) भारतात लग्नाचा मोसम सुरू झाला आहे. भारतात लग्नसमारंभात सोन्या-चांदीचे दागिने देण्याचे विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत, या लग्नाच्या मोसमात तुम्हीही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणार असाल, तर त्यासाठी तुम्हाला अधिक खर्च करावा लागेल.


जाणून घ्या प्रमुख शहरांमधील सोने आणि चांदीचे दर


दिल्ली- 24 कॅरेट सोने 62,170 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 76,000 रुपये
मुंबई- 24 कॅरेट सोने 62,020 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 76,000 रुपये
कोलकाता- 24 कॅरेट सोने 62,020 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 76,000 रुपये
चेन्नई- 24 कॅरेट सोने 62,600 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 79,000 रुपये
नोएडा- 24 कॅरेट सोने 62,170 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 76,000 रुपये
जयपूर- 24 कॅरेट सोने 62,170 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 76,400 रुपये
लखनौ- 24 कॅरेट सोने 62,170 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 76,000 रुपये
पाटणा- 24 कॅरेट सोने 62,070 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 76,000 रुपये
गाझियाबाद- 24 कॅरेट सोने 62,170 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 76,000 रुपये
पुणे- 24 कॅरेट सोने 62,020 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 76,000 रुपये


आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे दर किती?


आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. कॉमेक्सवर, सोने कालच्या तुलनेत 0.29 टक्क्यांनी वाढले आहे. तर  चांदीच्या दरात  0.33 टक्क्यांच्या वाढ झाली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Jalgaon News : सोन्याची दिवाळी, जळगावचा सुवर्ण बाजार ग्राहकांनी फुलला, सुवर्णनगरीत 150 कोटींहून अधिकची उलाढाल